- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ST Employee financial fraud case: अकोट न्यायालय : सदावर्ते दांपत्याच्या अटकपूर्व जामीनसाठी 22 एप्रिल रोजी निकाल!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
नीलिमा शिंगणे जगड
अकोला/अकोट: संपकरी एस टी कर्मचारी यांची दिशाभूल करुन आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते आणि त्याच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीनावर आज अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालय येथे सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान आकोट आगरातील कर्मचा-यांकडून घेतलेले पैसे परत करण्यास सदावर्ते तयार असल्याचे आरोपी सदावर्तेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी निकालासाठी 22 एप्रिल ही तारीख दिली आहे.
आकोट पोलीसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी व्यवसायाने वकील असलेले मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते आणि त्याची पत्नी जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, याकरिता आपल्या वकीला मार्फत आकोट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जवर आज आकोट जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बाविस्कर यांच्या समोर सुनावणी झाली.
ॲड मुन्ना खान यांनी सदावर्ते दाम्पत्याची तर ॲड. अजित देशमुख यांनी सरकार पक्षाची बाजू न्यायालयसमोर मांडली. युक्तिवादात ॲड. मुन्ना खान यांनी सदावर्ते यांची बाजू मांडत, आपण (सदावर्ते) पैसे घेतले असल्याचे म्हंटले. मात्र,हे पैसे फसवणूक नसून ही वकील फी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही कुणाला आपत्ती वा आक्षेप असल्यास आकोट आगारातील कर्मचा-यांकडून घेतलेले पैसे आपण परत करण्यास तयार असल्याचे ॲड. खान यांनी कोर्टाला सांगितले.
सरकारी वकील अजित देशमुख यांनी फसवणूकीने घेतलेले पैसे परत केल्याने गुन्हा नष्ट होत नसल्याचे सांगितले. या गुन्ह्याचे गांभिर्य आणि त्याची व्याप्ती तसेच होणारे अनिष्ट परिणामांची न्यायालयाला विस्तृत माहिती दिली. सदावर्ते दांपत्याच्या अटकपूर्व जामीनाला जोरदार विरोध करुन आपले कथनाचे पुष्ट्यर्थ काही निवाडे न्यायालयात सादर केले.
न्यायाधिश चकोर बाविस्कर यानी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर पुढील तारीख 22 एप्रिल दिली.
याआधी अटक झालेले सहआरोपी अजयकुमार गुजर आणि प्रफुल गावंडे यांना अकोट न्यायालयाने 30 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Ajay Gujar
Akot Court
Employees Strike
financial fraud
Gunratna Sadavarte
Praful Gawande
ST Employee
ST strike
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा