ST Employee financial fraud case: एस टी. कर्मचारी आर्थिक फसवणूक प्रकरण: अजय गुजर व प्रफुल्ल गावंडेला एक दिवसाची पोलीस कोठडी






नीलिमा शिंगणे जगड

अकोला: एस टी चे माजी संचालक विजय मालोकार यांनी दिलेल्या तक्रारी नंतर अकोल्यातील अकोट शहर पोलिसात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सह त्यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील, औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडेवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केले होते. आज या प्रकरणातील आरोपी अजय गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांना अकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.


या प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल गावंडे याने काल अकोला पोलिसात शरणागती पत्करली होती. तर दुसरा आरोपी अजय गुजर याला अकोला पोलिसांनी रात्री औरंगाबादेतून ताब्यात घेतले . आज या दोन्ही आरोपींना अकोट न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 




चारपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतल्या नंतर आता मुख्य आरोपी ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा त्ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, यावर उद्या सुनावणी होणार आहे,असे अकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी सांगितले.

टिप्पण्या