kisanrao-hundiwaale-murder case: किसनराव हुंडीवाले हत्याकांडाचा निकाल: श्रीराम गावंडेंसह दहा आरोपींना जन्मठेप; पाच जणांची निर्दोष मुक्तता




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला | नीलिमा शिंगणे जगड 

गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आज अकोला न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या बहुचर्चित खटल्यात श्रीराम गावंडे यांच्यासह दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, पुराव्याअभावी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि जिल्हा सरकारी वकील राजेश्वर उर्फ गिरीश देशपांडे यांनी सरकारची बाजू मांडली.



घटना नेमकी काय होती? (पार्श्वभूमी)


गवळी समाजाचे नेते किशनराव हुंडीवाले हे ६ मे २०१९ रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते.

दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.


तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया


या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची सुरुवात तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केली. त्यानंतर

सोहेल शेख (बालापूर)

उमेश माने पाटील (शहर उपविभागीय पोलीस अधिकारी)

पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील

यांनी पुढील तपास करत १ हजारांहून अधिक कागदपत्रांची चार्जशीट न्यायालयात दाखल केली होती.


न्यायालयाचे निरीक्षण


सुनावणीदरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत ठोस व विश्वासार्ह पुरावे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित आरोपींच्या निर्दोष मुक्ततेची विनंती केली होती.



जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे


श्रीराम गावंडे

रणजीत गावंडे

विक्रम गावंडे

सूरज गावंडे

धीरज गावंडे

विशाल तायडे

सतीश तायडे

प्रतीक तोंडे

मयूर अहीर

दिनेश राजपूत


निर्दोष मुक्त करण्यात आलेले आरोपी


प्रवीण श्रीराम गावंडे

मंगेश गावंडे

दिपाली गावंडे

नम्रता गावंडे

शेख साबीर


ठळक मुद्दे (News Highlights)

बहुचर्चित हुंडीवाले हत्याकांडाचा अखेर निकाल

१० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

५ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

१ हजारांहून अधिक कागदपत्रांची चार्जशीट

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा महत्त्वाचा युक्तिवाद


टिप्पण्या