- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
hit-and-run-case-in-umari-akl: चार चाकी गाडीने दुचाकीला स्वारासह अर्धा किलो मीटर नेली फरफटत; एक जखमी, रस्त्यावरील गाड्यांचे नुकसान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र पोलिसाचा लोगो लावलेल्या एका चारचाकी गाडीची अकोला शहरातील उमरी भागातील अज्ञात नागरिकांनी तोडफोड केली आहे. या तोडफोडीत गाडीचा प्रचंड नुकसान झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी गाडी चालकाने काही दुचाकींना धडक देऊन पळ काढला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी या गाडीचा पाठलाग केला आणि या गाडीची तोडफोड केली.या चार चाकी गाडीने एका दुचाकी गाडीला सुमारे अर्धा किलोमीटर फरफटत नेले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहे. या घटनेतील एका जखमी दुचाकी स्वारावर उपचार सुरू असून, चारचाकी गाडी चालक या घटनेनंतर पसार झाला आहे.
सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या उमरी मधील ग्रामपंचायत समोर एका चार चाकी कारने दुचाकीस्वारास मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी स्वारास काही अंतरावर फरपटत नेऊन पुढे दुचाकी लहान उमरी येथील नाक्या पर्यंत घासत आणली. सदर अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, अपघाताचा थरार बघायला मिळाला आहे. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सविस्तर घटना अशी की दुचाकीस्वार गोपाल नागे एसटी महामंडळ मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. मोठी उमरी येथील ग्रामपंचायत जवळील दुध डेअरी मधून साहित्य घेऊन झाले असता अचानक मागून चार चाकी कार क्रमांक एम एच 28 DK 2735 ने दुचाकीला मागुन जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकी क्रमांक एम एच 30 W 5850 ला चालकासह काही अंतरावर कार चालकाने फरफटत नेले.
दुचाकीस्वार गोपाल नागे रस्त्याच्या कडेला खाली पडले. परंतु कार चालक इथेच थांबला नसून पुढे लहान उमरी येथील नाक्यापर्यंत ही दुचाकी चक्क घासत नेली. उमरी परिसरामध्ये रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी सदर दुचाकी फरफटत नेताना प्रत्यक्ष बघितल्यामुळे नागरिकांनी कार चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार चालक तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला.
संतप्त नागरिकांनी यावेळी कारची तोडफोड केली. दरम्यान सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणून कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा