ST Employee financial fraud case: अकोट पोलिसांच्या मार्गातील अडथळे दूर; आरोपी गुणरत्न सदावर्तेला ताब्यात घेणार, अटकेत असलेल्या दोन आरोपींना 30 एप्रिल पर्यंत न्यायिक कोठडी

                                     संग्रहित छायाचित्र





नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांची दिशाभूल करुन केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी मुख्य आरोपी असलेला गुणरत्न सदावर्ते याचा चौकशीकामी ताबा मिळावा व त्याला आकोट येथे आणण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अकोट पोलीसांनी केलेला विनंती अर्ज आकोट न्यायालयाने आज मंजूर केला असल्याने सदावर्तेला चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले आहेत.




दरम्यान, अकोट पोलिसांनी यापूर्वी देखील विनंती अर्ज न्यायालयात केला होता. मात्र हा अर्ज मागे घेण्यात आला होता. आज पुन्हा हा अर्ज JMFC न्या. एम. जी. हिवराळे यांचे समोर दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणी होवून न्या. हिवराळे यांनी अर्ज मंजूर करून, सदावर्तेला चौकशीसाठी आकोट येथे आणण्याची परवानगी दिली आहे. 



ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन  दिवसात आकोट पोलीसांचे पथक सदावर्तेला ताब्यात घेण्यासाठी निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 



अटक असलेल्या दोन आरोपींना एम सी आर


दरम्यान, याआधीच अटकेत असलेले सह आरोपी अजय गुजर व प्रफुल्ल गावंडे यांना न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत न्यायिक कोठडी सुनावली. त्यामुळे आकोट पोलीस यांनी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय आकोट येथे धाव घेतली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांचे समोर आज सुनावणी झाली.  




दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी आकोट पोलीसांनी दाखल केलेली रिविजन जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजूर करुन, यासाठी पुन्हा JMFC, आकोट यांच्याकडे जाण्याचे निर्देश दिले आहेत.




सरकार पक्षातर्फे ॲड.अजित देशमुख व ॲड जी. एल. इंगोले यांनी युक्तिवाद केला.




हे सुध्दा वाचा 

एस टी. कर्मचारी आर्थिक फसवणूक प्रकरण: अजय गुजर व प्रफुल्ल गावंडेला एक दिवसाची पोलीस कोठडी





टिप्पण्या