Akola news letter: शिक्षकांना जूनी पेन्शनकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करु -पालकमंत्री ना. बच्चू कडू


Follow up teachers at the government level for old age pension - Guardian Minister 





अकोला,दि.17: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जूनी पेन्शन लागू व्हावी ही रास्त मागणी असून शिक्षकांना पेन्शन लागू व्हावी याकरीता शासनस्तरावर पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजनेचा आढावा पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.  


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचित्रा पाटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैधाली ढग, विठ्ठल पवार, श्रीराम पालकर, कल्पना राऊत व शिक्षक संघर्ष समितीचे सदस्य  व  शिक्षक उपस्थित होते.


राज्य शासनाने 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना जूनी पेन्शन योजना बंद केली आहे. पेन्शन मिळणे हे अधिकारच असून कर्मचारी व शिक्षक संघटनेची जूनी पेन्शन लागू व्हावी ही मागणी शासनस्तरावर पाठपुरावा करु. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावू, अशी ग्वाही पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी  दिली.




हे सुद्धा वाचा:राज्यातील शालेय शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी- मागणी



                    *****

जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची केली पाहणी; नादुरुस्त रस्ते तातडीने मार्गी लावा- पालकमंत्री बच्चू कडू निर्देश



Inspection of major roads in the district;  Get rid of bad roads immediately - Guardian Minister Bachchu Kadu





अकोला,दि.17: जिल्ह्यातील प्रमुख रस्ते असलेले डाबकी येथील कॅनॉल रोड, फत्तेह चौक या रस्तांची आज पाहणी केली. जिल्ह्यातील प्रमुख रस्ते असून नेहमीच वरदळ असलेल्या या रस्तांचे कामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी महानगरपालिका यांना दिले.  




जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची पाहणी करताना पालकमंत्री ना. बच्चू कडू बोलत होते. यावेळी महानगरपालिका  आयुक्त कविता व्दिवेदी, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, तहसिलदार सुनील पाटील आदी उपस्थित होते.


            

जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची पालकमंत्री बच्चू कडू पाहणी करताना निर्देश दिले की, बऱ्याच वर्षापासून प्रंलबित असलेले कॅनॉल रोड मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव तयार करा. यासाठी जलसिंचन विभाग व महानगरपालिका यांनी समन्वयाने काम करुन रस्तांचे कामे प्राधान्याने मार्गी लावा. तसेच याभागात पाणी टंचाईची समस्या असून नवीन टाकी लावण्यासाठी नियोजन करा. तसेच शहराच्या मध्यभागातील फत्तेह चौक भागातील रस्ते नादुरुस्त असून या रस्तांचे कामे पुर्ण करा, असेही निर्देश यावेळी दिले. डाबकी रोड  येथील श्रीमती कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयाची इमारत कालबाह्य व नागरिकांना सोईसुविधाचा अभाव असल्याने रुग्णालयाचा परिपुर्ण प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश ना. बच्चू कडू यांनी महानगरपालिकाना दिले.   



हे सुद्धा वाचा:प्रभाग आठ डाबकी रोड येथे पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट; भाजपाने वाचला नागरी समस्यांचा पाढा



                    ******

                 लसीकरण



उद्या दिनांक 18/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट

4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

6)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

7)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

8) GMC अकोला

9) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

10)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत

मनपा शाळा

11) आर  के टी आयुर्वेदिक महाविद्यालय जठारपेठ


 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covexin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.




           *कोरोना अलर्ट*


*आज रविवार दि.१७ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

 

*प्राप्त अहवाल-३०५*

*पॉझिटीव्ह-शून्य*

*निगेटीव्ह-३०५* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- शून्य


*अतिरिक्त माहिती* 


आज  दिवसभरात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२६७+१४४२९+१७७=५७८७३*

*मयत-११३८*

*डिस्चार्ज-५६७१६*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१९* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार) 


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*




              विसर्ग अलर्ट


*काटेपूर्णा प्रकल्प* 

  *17/10/2021         संध्या 5.00 वा* 

        

 *जलाशय पातळी - 347.77 मिटर*

 *उपयुक्त साठा- 86.35 द.ल.घ.मी.* 

 *टक्केवारी - 100 %* 

 *आजचा पाऊस- 3.00 मी मी*  

 *एकूण पाऊस - 784.00 मी मी*

 *2 गेट  प्रत्येकी 30 से मी उघडली आहेत*   

 *विसर्ग :--51.16 घ.मी./सेकंद*




*वान प्रकल्प* 

आज दि. १७/१०/२०२१ रोजी साय. ६:००  वाजता वान  प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग  ९०.९६ घ.मी./से. वरून कमी करून  २७:०० घ.मी./से.एवढा करण्यात येत आहे. आता प्रकल्पाचे  २ वक्रद्वारे प्रत्येकी १५ cm उंचीने उघडुन  नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 


 *वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष* 






टिप्पण्या