Educational Newsletter:pension: राज्यातील शालेय शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी- मागणी

 

Educational Newsletter: The old pension scheme should be implemented for the teachers and non-teaching staff in the school education department of the state.



ठळक मुद्दे

*विदर्भ जुनी पेन्शन योजना कृती समिती आंदोलनाच्या तयारीत 



*आता शब्द नको कृती हवी- प्रा. अशोक भराड 





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त झालेल्या राज्यातील शालेय शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी विदर्भ जुनी पेन्शन कृती समितीच्या वतीने विधानपरिषद सदस्य गोपीकिसन बाजोरिया, विप्लव बाजोरिया, पदवीधर आमदार रणजित पाटील, शिक्षक आमदार किरण सरनाईक ह्यांचेशी सविस्तर चर्चा करुन निवेदन सादर केले.




१९८२ च्या जुनी पेन्शनसाठी दि २४ जुलै २०१९ रोजी आझाद मैदान,मुंबई येथे सौ संगिताताई शिंदे यांच्या उपोषणानंतर राज्यातील दि १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विना व अंशत: अनुदानीत शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन  योजना लागु करण्यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी संयुक्त समिती स्थापन केली होती सदर समितीने अभ्यास करुन तीन महिन्यात मंत्रीमंडळास शिफारशी सादर करणे बंधनकारक होते परंतु तीन वर्ष उलटुनही अहवाल सादर झाला नाही हा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करुन मंत्रीमंडळ समोर सादर करण्याचे आवाहन शिक्षक, पदवीधर तसेच विधानपरिषद सदस्यांना करण्यात आल्याची माहीती विदर्भ जुनी पेन्शन योजना कृती समितीचे विभागीय अध्यक्ष प्रा अशोक भराड यांनी दिली.



याप्रसंगी डॉ रणजीत पाटील यांनी २००५ पुर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांवरील अन्याय दुर करण्यासाठी विधानपरिषद सभापतींच्या दालनात तात्काळ बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तर गोपीकिशन बाजोरीया व विप्लव बाजोरीया यांनी संयुक्त समिती सदस्यांची भेट घेऊन त्यामधील कायदेशीर बाजु पाहुन व कायद्याचा आधार घेऊन या बाबतीत अभ्यासपुर्वक लक्षवेधी विधिमंडळ अधिवेशनात लावुन शासनास जाब विचारण्याचे आश्वासन दिले तर शिक्षक आमदार  किरणराव सरनाईक यांनी जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी विधिमंडळात सर्वोतोपरी प्रयत्न करुन संयुक्त समितीचा सकारात्मक शिफारशींचा अहवाल लवकरात लवकर मंत्रीमंडळास सादर करण्यासाठी प्रयत्नरत असुन त्यासाठी आंदोलन करण्याचे काम पडले तरी हरकत नसल्याचे उपस्थितांना सांगीतले.

              



याप्रसंगी विदर्भ जुनी पेन्शन योजना कृती समिती प्रांताध्यक्ष, प्रा चंद्रशेखर म्हैसने यांनी न्यायालयातील याचिकेसंदर्भात उपस्थित आमदार महोदयांना माहीती सविस्तर माहीती दिली तर विभागीय अध्यक्ष प्रा अशोक भराड यांनी आतापर्यत युती, आघाडी व महाविकास आघाडी सरकारने याबाबत खुप आश्वासने दिली असुन ती कृतीत उतरविण्याची वेळ आली आहे अन्यथा शासनास दि १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेत्तरांच्या रोषास सामोरे जावे लागेल असे सांगीतले. 



दरम्यान या चर्चेत सल्लागार सर्वश्री प्रा श्रीराम पालकर, प्रा संजय म्हैसने,ह्यांनी आपली मते मांडली तर संजय तायडे, प्रा प्रशांत मलीये, उज्ज्वल पागृत, संजय ठाकरे, प्रमोद जामनीक, शिंदे, लकडे, इंगळे, ढाकरे, प्रा संदीप बाहेकर, प्रा संजय गोळे, प्रा मोहन पटोकार, गावंडे, नवलकार, प्रा विठ्ठल पवार, पंजाब साबीले, प्रा रामेश्वर राठोड, प्रा राजेश चौव्हाण, आखरे, फोकमारे, ढोरे, मो मुशीर, अकबर शेख, उमेश महल्ले, किशोर पाटील, प्रा अविनाश काळे, मुरकुटे आदींसह अनेक पेन्शनग्रस्त प्राथ, माध्य,माध्य उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



                      ******



Corona Warrior Award:Akola: मुख्याध्यापक संघाचा कोरोना योद्धा पुरस्कार: अरुण राऊत, कल्पना धोत्रे, विजय ठोकळ, नरेंद्र काळे, आनंद साधू सन्मानित



   Corona Warrior Award



अकोला: कोरोना काळामध्ये शिक्षण विकासासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मुख्य अध्यापकांचा सन्मान अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ तर्फे करण्यात आला.



माध्यमिक शाळा मुख्याध्यापक covid-19 काळामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करून शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक देखील कार्य पूर्ण करण्याचं काम केलं. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, भोजन साहित्य, गहू तांदूळ त्याचबरोबर आर्थिक मदत सुद्धा केली. एवढेच नव्हे तर शिक्षकांना घरोघरी पाठवून त्यांचे शैक्षणिक कार्य देखील पूर्ण केले. अशा मुख्याध्यापकांचा जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार करण्यात आला. 


सत्कारमूर्ती


यामध्ये जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण राऊत, महाराष्ट्र माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद साधू, भाऊसाहेब तिरुख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना धोत्रे, बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे गजेंद्र काळे आणि शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे निंबा येथील मुख्याध्यापक विजय ठोकळ यांचा पुरस्कारांमध्ये समावेश आहे.   



प्रमुख उपस्थिती


शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहांमध्ये महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, सदस्य विधान परिषद अमरावती विभाग शिक्षक आमदार किरण सरनाईक, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिडकर, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य भिशे, अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बळीराम झामरे, सचिन दिनेश तायडे, उपाध्यक्ष मुक्तार भाई, जिल्हा संघटक दिनेश दिनकर गायकवाड, संचालक रमेश चव्हाण, विलास कुमकर, अकोला शहर अध्यक्ष सरफराज खान, सचिव डॉक्टर प्रकाश डवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 



याप्रसंगी कार्यक्रमाचे संचलन डॉक्टर पेठे तर आभार प्रदर्शन काळे यांनी केले.


                      ******

टिप्पण्या