akola-crime-notorious-gang-: दरोडयाच्या तयारीत असलेली कुख्यात टोळी जेरबंद; LCB अकोलाच्या सतर्कतने मोठया घटनेची पुनरावृत्ती टळली
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: दरोडयाच्या तयारीत असलेली कुख्यात टोळी जेरबंद करुन, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने टोळी कडून पिस्टल, चाकु, महींद्रा XUV 500 कार सह १० लाख ५९ हजार ७०० रूपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक १४ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, काही आरोपी वाशीम बायपास जवळील अंबीका नगर रस्त्यावर एक संशयीत महींद्रा XUV 500 कार ची नंबर प्लेट बदलुन उभे असल्याची माहिती मिळाली होती.
सदर माहिती पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा यांनी पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पथक कारवाई साठी घटनास्थळी रवाना केले.
अशा माहीती वरून स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने छापा टाकला असता तीन आरोपी ताब्यात घेतले. तसेच दोन आरोपी त्याठिकाणावरून फरार झाले. आरोपीची व वाहनाची झडती घेतली असता, त्यांचे कडुन एक गावठी बनावटीची पिस्टल दोन जिवंत काडतुस, एक चाकु, एक लोखंडी आरी, चेहरा झाकण्यासाठी मास्क, हँडग्लोज, तीन मोबाईल, कार मध्ये असलेले वाहनाचे खोटे नंबर प्लेट, एक महींद्रा XUV 500 कार असा एकुण १०,५९,७०० रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
आरोपी निहाल अहमद फिरोज अहमद (वय २६ वर्ष रा. अलकरीम नगर वलगांव रोड अमरावती), सैय्यद अली सैयद अनिस (वय २२ वर्ष रा. जमजम नगर खामगांव रोड शेगांव जि. बुलडाणा), शे. ईलीयास शे. अयाज वय २५ वर्ष रा. देशपांडे प्लॉट वाशिम बायपास अकोला यांना पोलीसांनी अटक केली आहे. तसेच फरार आरोपी हा अमरावती येथील रहिवासी असून, नाव जुनेद असल्याचे कळते. तर गुन्ह्यात आणखी एक अनोळखी इसमाचा समावेश असल्याचे समजते.
अटक व फरार आरोपीतांचे क्राईम रेकॉर्ड चेक केले असता, त्यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मलकापुर जिल्हा बुलढाणा येथुन एका व्यापा-याची २० लाख रूपये खंडणी साठी अपहरण करून, जात असतांना कोटा राजस्थान येथील स्थानीक पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान त्यांना पकडुन व्यापा-याची सुटका करून त्यांचे कडुन दोन पिस्टल जप्त केल्या होत्या.
तसेच आरोपी शेख इलीयास शेख अयाज (वय २५ वर्ष रा. देशपांडे प्लॉट वाशिम बायपास अकोला) याच्या विरूध्द अनेक गुन्हे नोंद असल्याने त्यास एमपीडीए कायदयांतर्गत सन २०२२ मध्ये एका वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले होते.
एकंदरीत घटनेच्या वेळी आरोपीतांच्या हालचाली, शस्त्र सज्जता, वाहनाचा वापर व निष्पन्न झालेली गुन्हेगारी पार्श्वभुमी यावरून आरोपी अकोल्यात कोणतातरी मोठा गंभीर गुन्हा करण्याची तयारीत होते पंरतु स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांचे सतर्कतेने संभाव्य गंभीर गुन्हयात प्रतिबंध झाला आहे.
यातील आरोपीतां विरूध्द अपहरण, खंडणी, जिवे मारण्याचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, दंगा करणे व अवैध अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असल्याचे काईम रेकॉर्डवरून दिसुन आले आहे.
सदर आरोपीतांचे विरूध्द पोलीस स्टेशन जुनेशहर येथे कलम ३१० (४), ३१० (५) भारतीय न्याय संहिता सह कलम ३/२५,४/२५ शस्त्र अधिनीयम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास स.पो.नि विवेकानंद भारती पोलीस स्टेशन जुनेशहर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहायक पोलीस निरिक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक गोपाल जाधव विष्णु बोडखे, माजीद पठाण, सहायक पोलीस उप निरिक्षक गणेश पांडे यांच्या सह शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनुने, वसिमोद्दीन, एजाज अहमद, भारकर धोत्रे, खुशाल नेमाडे, राजसिंह चंदेल, अभिषेक पाठक, आकाश मानकर, श्रीकांत पातोंड, अशोक सोनवणे, अमोल दिपके, विनोद ठाकरे, देवानंद खरात यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा