civic issues: Akola city:ward8: प्रभाग आठ डाबकी रोड येथे पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट ; भाजपाने वाचला नागरी समस्यांचा पाढा



Meeting of Guardian Minister Bachchu Kadu at Ward 8 Dabki Road;  BJP survives civic issues,








नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: भाजपा दक्षिण- पश्चिम मंडळ मधील पदाधिकारी व नगरसेवक यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देऊन प्रामुख्याने पथदिवे, पाणीपुरवठा, रस्ते या विकास कामांना गती द्यावी, अशी मागणी प्रत्यक्ष चर्चा करतेवेळी केली. 




आज प्रभाग आठ डाबकी रोड परिसर मध्ये नामदार बच्चू कडू यांनी भेट दिली असता, मंडळाचे अध्यक्ष निलेश नीनोरे, माजी उपमहापौर वैशाली  शेळके. रंजना विंचनकर, सतीश ढगे, संजय तिकांडे, सुनील धामणीकर, अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 8 व दक्षिण पश्चिम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.






या आहेत मागण्या



अकोला पूर्वचे  जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकरांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून  हद्दवाढ  क्षेत्रासाठी 100 कोटी रुपये विशेष निधी व आपल्या विशेष निधी अंतर्गत या अविकसित भागाच्या साठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून पथदिवे रस्ते पिण्याच्या पाण्याची साठी पाईपलाईनची व्यवस्था केली आहे. परंतु महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने आमदार रणधीर सावरकर यांनी आणलेल्या निधीचे काम थांबले आहे. आपण महाराष्ट्रातील वजनदार मंत्री म्हणून व विकास कामासाठी दक्ष म्हणून ओळखल्या जातात. आपण या भागाच्या विकासासाठी व या भागातील लोकप्रतिनिधी यांनी आमदार सावरकर यांच्या मार्फत कॅनाल रोड साठी निधी मंजूर करून आणला. काम त्वरित करण्यात यावा, कॅनाल रोड नाका ते रेल्वे गेट या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण त्वरित करण्यात यावे. 



या भागातील रस्ते पिण्याच्या पाण्याची साठी पाईप लाईन, पथदिवेचा निधी राज्य शासनाने जो थांबला तो देण्यात यावा, 



अकोला महानगर पालिका साठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी,




अकोला महानगर पालिकेला विशेष निधी देण्यात यावा, 




अकोला शहरातील हद्दवाढ  क्षेत्रातील प्रभागासाठी विशेष निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करावे. 




डाबकी रोड उड्डाणपूल साठी राज्य शासनाकडून निधी देण्यात यावा.






टिप्पण्या