- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
IAS Transfer: अखेर पापळकर यांची हिंगोली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती; अकोला मनपाला मिळाले नवे आयुक्त बोडके तर महाबीज संचालकपदी रुचेश जयवंशी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: महानगरपालिका आयुक्त पदी गोविंद बोडके यांची नियुक्ती झाल्याने अकोल्यात घडलेल्या अदली-बदलीचे राजकारण आणि उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर अकोला महानगर पालिका आयुक्तपदी गोविंद बोडके यांची नियुक्ती करण्यात आली असून जितेंद्र पापळकर यांची हिंगोली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रिक्त असलेल्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण येथील सहव्यवस्थापकीय संचालक जी.एम.बोडके यांची आज शासनाने प्रशासकीय बदल्या करतांना अकोला महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती केली. तर पापळकर यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदी नियुक्ती जाहीर केली आहे.
अकोला मनपा आयुक्तपदावर बदली झाल्यानंतर पदभार घेण्यास स्पष्ट नकार देत, रजेवर गेलेले जितेंद्र पापळकर यांची आज ३० जुलैला हिंगोली जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. राज्य शासनाकडून १३ जुलैला अकोला मनपा आयुक्तपदावर नियुक्ती केल्याचे आदेश आल्यावर १४ जुलै रोजीच जिल्हाधिकारी पापळकर यांनी मुबंई गाठून वरिष्ठ अधिकारी व संबंधिताची भेट घेत अकोला मनपा आयुक्तपदाचा पदभार घेण्यास नकार दिला होता.अकोला मनपा आयुक्त सोडून इतरत्र नियुक्ती मान्य असल्याचे पापळकर यांनी वरिष्ठ अधिका-यांना सांगीतले होते. मुबंई येथून परत आल्यावर जिल्हाधिकारी पापळकर यांनी १५ जुलैला नीमा अरोरा यांना जिल्हाधिकारीपदाची सुत्रे सोपवली होती. आज ३० जुलैला पपापळकर यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली.
अकोला जिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाने अकोला महापालिका आयुक्त निमा अरोरा यांची यापूर्वीच्या आदेशात नियुक्ती केली होती. तर अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची महापालिका आयुक्त पदावर नियुक्ती केली होती. राज्य शासनाने इतर ही जिल्ह्यात वरिष्ठ अधिकार्यांची बदली केली. मात्र, अकोल्यात जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्यात झालेली बदली प्रकार प्रशासकीय क्षेत्रात पहिल्यांदाच झाला असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. या अदलीला बदली प्रकार बाबत प्रशासकीय क्षेत्रा सोबतच सामाजिक राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येतहोते. तर हा प्रकार करण्यामागे राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्यापर्यंत अकोल्यात चर्चा झाल्या. स्थानिक नेत्यांची नाराजगी ओढवून घेतल्यामुळे हा डाव खेळल्या गेला असल्याची देखील चर्चा शहरात रंगली होती. आता या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.तर बऱ्याच वर्षांपासून महाबीजच्या संचालकपदी काम करण्यास IAS अधिकारी इच्छुक नसल्याने येथे नियुक्त अधिकारी लगेच दुसरीकडे बदली करून घेतात. राहुल रेखावर यांच्या बदली नंतर हे पद रिक्तच होते. आता रुचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे.
शासन निर्णयानुसार या अधिकाऱ्यांच्या बदली (३० जुलै)
०१.श्री संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.
०२. श्री अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.
०३. श्री मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.
०४. श्री सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.
०५. श्री प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.
०६. श्री कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.
०७. श्री जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.
०८. श्री एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.
०९. श्री एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.
१०. श्री राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.
११. श्री जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.
१२. श्री रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.
१३. श्री एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.
१४. श्री दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा