IAS officer Transfer: राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या: जितेंद्र पापळकर अकोला मनपा आयुक्तपदी ; तर नीमा अरोरा नव्या जिल्हाधिकारी


Transfers of 20 IAS Officers in maharashtra 




 

अकोला : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या असून त्यामध्ये अकोला मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची सुद्धा बदली झाली आहे. अकोला मनपा आयुक्त निमा अरोरा या जिल्हाधिकारी म्हणून तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची अकोला मनपा आयुक्त म्हणून बदली झाली आहे.




राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या (IAS Officer Transfer) करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची बदली करण्यात आली आहे. रुबल अग्रवाल यांची आयुक्त एकात्मिक बालविकास योजना मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. अग्रवाल या 2008 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांच्या जागेवर जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 




कोल्हापूर, हिंगोली, अमरावती, जालना येथील जिल्हाधिकार्‍यांचा देखील बदल्यांमध्ये समावेश आहे. रत्नागिरी आणि परभणी येथे नवीन जिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.





बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव: बदलीचे ठिकाण


1. ओ.पी. गुप्ता (O.P. Gupta) - प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांची बदली प्रधान सचिव (खर्च), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.


2. विकासचंद्र रस्तोगी (Vikas Chandra Rastogi) - प्रधान सचिव (AR & OM), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची बदली मुंबईचे प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग येथे करण्यात आली आहे.


3. इंद्र मिल्लो (Indra Mallo) - आयुक्त एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबई यांची बदली प्रधान सचिव (AR &OM), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.


4. रुबल अग्रवाल (Rubal Prakher-Agarwal) - अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका यांची बदली आयुक्त ICDC नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.


5. अजित पाटील (Ajit Patil) - सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांची बदली सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC मुंबई येथे करण्यात आली आहे.


6. दौलत देसाई (Daulat Desai) - जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची बदली संयुक्त सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग, मुंबई येथे करण्यात आली आहे.


7. रुचेश जयवंशी (Ruchesh Jaivanshi) - जिल्हाधिकारी, हिंगोली यांची बदली आयुक्त, महिला व बाल, पुणे येथे करण्यात आली आहे.


8. संजय यादव (Sanjay yadav) - यांची नियुक्ती JTMD, MSRDC मुंबई येथे करण्यात आली आहे.


9. शैलेश नवाल (Shelesh Nawal) - जिल्हाधिकारी, अमरावती यांची बदली उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.


10. आर. एच. ठाकरे (R.H. Thackeray) - यांची नियुक्ती अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नागपूर येथे करण्यात आली आहे.


11. जे. एस पापळकर (J.S. Papalkar) - जिल्हाधिकारी, अकोला यांची बदली आयुक्त अकोला महानगरपालिका येथे करण्यात आली आहे.


12. जी.एम. बोडके (G.M. Bodke) - सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची बदली जिल्हाधिकारी, हिंगोली येथे करण्यात आली आहे.


13. राहुल अशोक रेखावार (Rahul Ashok Rekhawar) - अकोला व्यवस्थापकीय संचालक, एमएस एसिड कॉर्पोरेशन यांची बदली जिल्हाधिकारी कोल्हापूर येथे करण्यात आली आहे.


14. रविंद्र बनवडे (Ravindra Binwade) - जिल्हाधिकारी जालना यांची बदली पुणे महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.


15. दीपक कुमार मिना (Deepak Kumar Meena) - नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


16. पवनीत कौर (Pavneet Kaur) - आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांची बदली जिल्हाधिकारी अमरावती येथे करण्यात आली आहे.


17. विजय चंद्रकांत राठोड (Vijay Rathod) - अतिरिक्त कंट्रोलर ऑफ स्टॅम्प्स, मुंबई यांची बदली जिल्हाधिकारी जालना येथे करण्यात आली आहे.


18. निमा अरोरा (Nima Arora) - आयुक्त, अकोला महानगरपालिका यांची बदली अकोला जिल्हाधिकारी येथे करण्यात आली आहे.


19. आंचल गोयल (Aanchal Goyal) - सह व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई यांची बदली परभणी जिल्हाधिकारी येथे करण्यात आली आहे.


20. डॉ. बी.एन. पाटील (Dr.B.N. Patil) - यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


टिप्पण्या