crime-murder-case-khadan: आणखी एका हत्येने शहर हादरले:खदान परिसरात युवकाची हत्या; धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणारे जेतवन नगर येथे आज भर दिवसा भर रस्त्यावर एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली.  हल्लेखोर घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले. दरम्यान जखमी युवकास उपचारार्थ दवाखान्यात नेले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले. 



प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, आज रविवारी मृतक करण शितोळे हा सुटी असल्याने घरीच होता. मात्र आठवडाभराचे मजुरीचे पैसे आणण्याकरिता घरातून बाहेर जात असल्याचे त्याच्या आईस त्याने सांगितले. यानंतर तो मजुरीचे पैसे आणण्यास बाहेर पडला. मात्र थोड्या वेळाने त्याच्या आईला त्याने फोन करून सांगितले की, मला काही युवक मारहाण करीत आहे. तू मला वाचवायला ये. यानंतर त्याची आई तशीच घटनास्थळाकडे धावत निघाली मात्र घटनास्थळापर्यंत पोहोचण्या पूर्वीच तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्या पडलेला दिसला. यानंतर परिसरातील नागरिकांनी करण यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारार्थ भरती केले. मात्र तेथे वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले. 


दरम्यान मारहाण प्रसंगीचे क्षण परिसरातील एका सीसीटीव्ही मधे कैद झाला आहे. पीडित करण यास तीन ते चार युवक मारहाण करीत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे.घटनेनंतर हा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला. यावेळी करणचे दोन मित्र त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले जात आहे.



दरम्यान, मृतक करण याच्या आईने करण हा कोणाच्या लेण्यात ना देण्यात असलेला सरळ मार्गी मुलगा होता. त्याचे मारेकऱ्यांना मी ओळखत नाही. मात्र प्रशिक, निखिल नावाच्या युवकांनी करण यास मारहाण केली असल्याचा आरोप मृतकाच्या आईने केला आहे या घटनेचा अधिक तपास खदान पोलीस करीत आहेत.


अकोल्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख चढता झाला आहे. गुन्हेगारांवर  अंकुश ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील ढासळती कायदा व सुव्यवस्था पूर्ववत आणण्यासाठी सुज्ञ नागरिक, कायदे तज्ञ, समाज सुधारक आणि पोलीस विभागाने एकत्रित येवून काम करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.



New Update


घटनेचे कारण 


आपसी पूर्व वैमनस्यातून दोन गटात वाद होवून, ही मारहाणीची घटना घडली असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र करण शितोळे याची निर्घृण हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.




दोन संशयित ताब्यात 


या प्रकरणी खदान पोलिसांनी प्रशिक जावळे (वय 22) व मयुर मस्के (वय 23) (दोघेही रा. जेतवन नगर अकोला ) या संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खदान पोलिस करीत आहे.



जखमींवर उपचार सुरू 

या घटनेत मृतक करण दशरथ शितोळे (वय 22 वर्ष) याचे मित्र वैभव पुरुषोत्तम शितोळे (वय 19) व विशाल गणेश वरोटे (वय 29) गंभीर जखमी झाले असून, त्यांना खदान पोलिसांनी उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.


Jetwan nagar murder case news video पाहण्यासाठी येथे क्लिक करा


टिप्पण्या