- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
uddhav-sena-blocksroads-akl: अकोल्यात ३६ ठिकाणी उद्धव सेनेचा रास्तारोको; एकाच वेळी आंदोलन पुकारल्याने वाहतूक ठप्प
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता नुकतेच भारत सरकारने अमेरिके सोबत करार केला. हा करार तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच राज्य सरकारने जाहीर केलेले पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार रुपये शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे या करिता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या ५३ सर्कल अंतर्गत ३६ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरात एकाच वेळी रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
भारत-अमेरिकेत झालेल्या व्यापार करारामुळे कृषी क्षेत्रावर गंभीर दुष्परिणाम हाेणार असून, हा करार रद्द व्हावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एल्गार पुकारला. शेतकऱ्यांना देशाेधडीला लावणाऱ्या या कराराच्या विराेधात उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, २६ फेब्रुवारी राेजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील ३६ ठिकाणी एकाच वेळी रस्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले.
आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हा संघटिका माया म्हैसने, सरिता वाकोडे, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, विकास पागृत, योगेश्वर वानखडे, जिल्हासंघटक भूषण भिरड, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, ज्ञानेश्वर गावंडे, गजानन मानतकर, गजानन चौधरी, ब्रह्मा पांडे, संजय भांबेरे, उप ता. प्रमुख रामचंद्र घावट,जिल्हा संघटक शेतकरीसेना गजानन पुंडकर, राजेश वरोकार जिल्हा समन्वयक, गोपाल ठाकरे, राजू पाटील पागृत, केतन पाटील हागे, शंकरराव काळमेघ, सुनील भांडे, महिला संघटिका विना सोळंके, डाबेराव ताई, गजानन कागटे, हर्षु पाटील गावंडे, बाबुलाल वरणकर, उदय भाकरे, तुकाराम वारणकर, राधेश्याम पागृत, कैलास पागृत, अक्षय पागृत अन्नू पागृत, माणिक चोपडे, प्रवीण ढोरे, पंजाबराव गावंडे,गणेश इंगळे, काशीराम प्रधान,अक्षय पिंपरे, गोपाल पागृत, प्रमोद पागृत, संतोष गावंडे, अजीमभाई, अकाेला शहर प्रमुख राहुल कराळे, यांसह जिल्हा कार्यकारणी तसेच शहर कार्यकारणी मधील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपची टेरीफवरून दिशाभूल
अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. शेतीमालाचे भाव गडगडणार असून अमेरिकेमधून आयात केलेल्या शेतमालामुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी सरकारच्या काळात टेरीफमध्ये मोठी वाढ झाली असतानाही भाजपकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला.
भाजपा हा व्यापाऱ्यांचा पक्ष
आधीच भारतात शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या काही व्यापाऱ्यांची टाेळीच सक्रिय आहे. हे उद्याेगपती-माेठे व्यापारी भाजपचे दलाल आहेत. या उद्याेगपतींचा आर्थिक फायदा व्हावा, यासाठी सरकारने नवीन कायदे, करार करीत असल्याचा घणाघात आ.नितीन देशमुख व जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांनी केला. केंद्र सरकारच्या शेतकरी धाेरणाविराेधात राज्यातील भाजपप्रणित महायुती सरकारामधील मंत्री, नेते एकही शब्द काढत नसल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला.
अमेरिका
भारत
व्यापार करार
Akola
blocks roads
political news
protests
shivsena
standstill
Traffic
uddhav sena
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा