akshay-nagalakar-murder-case:बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणाचा उलगडा! चार आरोपी गजाआड; मुख्य सूत्रधारासह चौघांच्या मुसक्या आवळल्या



ठळक मुद्दे


अक्षय नागलकर मिसींग प्रकरणाचा ४८ तासात उलगडा


आठ आरोपींपैकी चार जण अटकेत


जुन्या वादातून खून करून मृतदेह जाळला


डाबकी रोड पोलिसांची जलद आणि परिणामकारक तपास कामगिरी




भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरात खळबळ उडवणाऱ्या अक्षय विनायक नागलकर मिसींग प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकरसह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे.


मिसींगपासून खूनापर्यंत; पोलीसांची अचूक तपासकामगिरी


दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सौ. शिला विनायक नागलकर यांनी त्यांच्या मुलगा अक्षय नागलकर (वय २६, रा. मारोती नगर, जुने शहर, अकोला) हा घरातून बाहेर पडून परत न आल्याने पो.स्टे. डाबकी रोड येथे मिसींग क्र. ४४/२०२५ अन्वये तक्रार दाखल केली होती.



प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अकोला यांनी तातडीने ८ तपास पथके गठीत केली. स्थानिक गुन्हे शाखेची ४, डाबकी रोड पोलिस स्टेशनची २ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची २.


गुप्त माहितीवरून आरोपींचा माग काढला


सतत ४८ तास अथक प्रयत्नांनंतर गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित चंद्रकांत बोरकर यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने थरारक कबुली दिली की,

त्याच्यासह


ब्रम्हा भाकरे


रोहित पराते


क्रिष्णा भाकरे


आशु वानखडे


शिवा माळी


आकाश शिंदे


अमोल उन्हाळे



यांनी जुन्या वादातून सूड म्हणून अक्षय नागलकर याचा खून केला.


मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न


सदर आरोपींनी भौरद येथील हॉटेल MH 30 येथे जेवणाच्या बहाण्याने अक्षयला बोलावले आणि त्याचा खून करून मोरगाव भाकरे येथील शेतातील टिन शेडमध्ये त्याचे शव जाळले, अशी धक्कादायक कबुली चंद्रकांत बोरकरने दिली.


चार आरोपी गजाआड, इतरांचा शोध सुरू


पोलिसांनी तातडीने कारवाई करून


1. चंद्रकांत महादेव बोरकर



2. अशोक उर्फ ब्रम्हा पांडुरंग भाकरे



3. कृष्णा वासुदेव भाकरे



4. आशु उर्फ आशिष शिवकुमार वानखडे




या चौघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.


पुढील तपास शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


या संपूर्ण तपासाची सूत्रे पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्याकडे आहेत. आरोपींवर खून, पुरावे नष्ट करणे, आणि गुन्हेगारी कट रचणे या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


मुख्य आरोपीची पार्श्वभूमी

दरम्यान, चंद्रकांत बोरकर हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात आरोपी असल्याचे समोर आले आहे. दोन दशकांपूर्वी घडलेल्या  सेक्सस्कॅनडल मध्ये तो मुख्य आरोपी होता. गुन्हा करून पुरावे नष्ट करून स्वतःहून पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याची त्याची सवय असल्याचेही पोलिसांच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय नागलकर आणि चंद्रकांत बोरकर यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.


अशी केली हत्या

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अक्षय नागलकरला एमएच 30 हॉटेलवर बोलावून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून कोयत्यासारख्या शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर, कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी आरोपींनी मृतदेह मोरगाव भाकरे येथील शेत शिवारातील टीनच्या शेडमध्ये नेऊन जाळला. केवळ जाळला नाही, तर राख हटवून शेड आतून धुऊन रंगही दिला.


अक्षय नागलकर missing case news हे देखील वाचा

अक्षय नागलकर बेपत्ता प्रकरण




AkolaCrimeNews AkshayNagalakarMurderCase AkolaPolice CrimeInMaharashtra BreakingNews AkolaUpdate MurderCaseSolved PoliceInvestigation AkolaCityNews LatestNewsAkola

टिप्पण्या