forest-leopard-death-wildlife-: बाळापुर–वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाची धडक; अपघातात मादी बिबट ठार




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला | बाळापुर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबटाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर बिबट सुमारे दोन ते अडीच वर्ष वयाची असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.


अकोला वनविभागास घटनेची माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली. सहायक वनसंरक्षक पवन जाधव व आरएफओ विश्वास थोरात यांच्या आदेशानुसार तसेच उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.



घटनास्थळी पोहोचलेले अधिकारी व कर्मचारी

वनपाल : गजानन गायकवाड

मानद वन्यजीव रक्षक : बाळ काळणे

वनरक्षक : एन. एन. सावळे, राम काकडे

कर्मचारी : यशपाल इंगोले, तुषार अवारे



पूर्वसूचना असूनही अपघात

या परिसरात यापूर्वीही बिबट दिसल्याची माहिती होती. त्यानुसार अकोला वनविभागाने प्रसारमाध्यमांद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांना सावधगिरीचे मार्गदर्शन केले होते. मात्र, वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी अपघात घडल्याचे बोलले जात आहे.


वनविभागाचे आवाहन


वन्यजीवांच्या वावर असलेल्या भागात वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा व अधिक दक्षतेने वाहन चालवावे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि वन्यजीवांचे संरक्षण होईल, असे आवाहन अकोला वनविभागाने केले आहे.



टिप्पण्या