- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
farmers-protest-barshitakli-akl: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेताल वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून तीव्र निषेध – बहिरखेड फाट्यावर "चपला मारो" आंदोलन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या बेताल आणि अवमानकारक वक्तव्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वक्तव्याचा निषेध करत बहिरखेड फाट्यावर शेतकरी एल्गार समिती, बार्शी टाकळी तालुक्याच्या वतीने रविवारी "चपला मारो" आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचा निषेध करत त्यांच्या वक्तव्याचे प्रातिनिधिक प्रतीक म्हणून त्यांच्या फोटोंना चपलांनी मारून रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांनी हातात निषेध फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली – "कोकाटे हाय हाय", "शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही", "कर्जमाफी हक्काची, भीक नव्हे!"
कोकाटे यांच्यावर उपचाराची मागणी
या आंदोलनादरम्यान एल्गार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले की, “कृषिमंत्री कोकाटे यांना बहुदा मानसिक विकार झाला असावा. त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर ज्या बेजबाबदार पद्धतीने वक्तव्य केले, ते मानसिक असंतुलनाचे निदर्शक आहे. त्यामुळे बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, अशी आमची कळकळीची विनंती आहे.”
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्यामध्ये किरण ठाकरे, महादेवराव गावंडे, अविनाश ठाकरे, प्रल्हाद माळकर, गणेश ताठे, दिलीप घुमसे, मनोहर कमानदार, जनार्दन ठोकळ, सुरेश वानखडे, स्वप्निल ठाकरे, अनंता घुमसे, मंगेश सोनटक्के, देविदास ठाकरे, पांडुरंग घुमसे, सोपान ठाकरे, रवी ठाकरे, बाबूसिंग चव्हाण, सोनू जाधव, समाधान इंगळे, बाळूभाऊ राऊत, गजानन गाढवे, कैलास इंगळे, अनिल इंगोले, सागर ठाकरे, सुभाष पाटील, मंगेश प्रधान, दादू बडवे, महेश ठाकरे, दत्ता घुमसे आदींसह तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी इशारा दिला की, जर शासनाने कोकाटे यांच्यावर कारवाई केली नाही, तर आगामी काळात हे आंदोलन जिल्हा व राज्य स्तरावर उग्र रूप धारण करेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात सरकारने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अन्यथा पुढील आंदोलनांची जबाबदारी सरकारवर असेल.
पोलीस बंदोबस्त ठेवून आंदोलन शांततेत पार पडले
या आंदोलनावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा परिसरात तैनात होता. तरीही सर्व आंदोलन शांततेत व संयमाने पार पडले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा