- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-court-news-katepurna-: बहुचर्चित काटेपूर्णा बालविवाह - 'पॉक्सो' प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
सरकार पक्षाला आरोप वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयश
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : काटेपूर्णा येथील कथित बालविवाह व पॉक्सो (POCSO) प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनी हा निर्णय दिला.
अन्वी मिर्जापूर (ता. जि. अकोला) येथील नितिन दुर्योधन उंबरकर, उर्मिला दुर्योधन उंबरकर आणि जया उर्फ ज्योती किसनराव गावंडे यांच्याविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीने तक्रारीत नमूद केले होते की, ती अल्पवयीन असताना तिच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून आरोपी क्र. १ नितिन याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
या प्रकरणाचा तपास अमरावतीहून वर्ग करण्यात आल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
१४ साक्षींच्या आधारे खटल्याचा निकाल
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध करण्यासाठी ११ साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे, सर्व साक्षीदारांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६१ अन्वये दिलेल्या जबाबाशी सुसंगत साक्ष नोंदविली; एकही साक्षीदार फितूर झाला नाही. बचाव पक्षाने तीन साक्षीदार तपासले. एकूण १४ साक्षींच्या आधारे खटल्याचा निकाल देण्यात आला.
साक्षींमधील तफावत आणि पुराव्यांतील त्रुटी
मात्र, मुलीची जन्मतारीख आणि काटेपूर्णा येथे कथित विवाह झाल्याचा ठोस व विश्वासार्ह पुरावा सरकार पक्षाला वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करता आला नाही. तसेच साक्षींमधील तफावत आणि पुराव्यांतील त्रुटी लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना निर्दोष घोषित केले.
आरोपी क्र. १ व ३ च्या वतीने ॲड. राजेश जाधव, ॲड. मुमताज देशमुख, ॲड. टिना नंदा, ॲड. सुनील जुनघरे, ॲड. प्रभात देशमुख, ॲड. समीर शेख आणि ॲड. रामराव चव्हाण यांनी कामकाज पाहिले. आरोपी क्र. २ च्या वतीने ॲड. गणेश परियाल, ॲड. मुक्ता दाने, ॲड. ज्योत्स्ना बोदडे आणि ॲड. अक्षय नवलकार यांनी बाजू मांडली.
बालविवाह व पॉक्सो अंतर्गत दाखल झालेल्या या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे अकोलेकरांचे लक्ष लागले होते.
Bhartiya Alankar News 24
adv rajesh jadhav
akola court
court news
court update
District court
Katepurna
Pocso Act
Sessions Court
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा