akot-crime-news-akola-police: आणखी एक देशी कटटा, दोन मॅक्झीन आणि पाच जिवंत काडतुस जप्त; लॉरेन्स बिष्णोईचे विदर्भात लागेबांधे असण्यामागचा उद्देश तरी काय?




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पोलीस स्टेशन अकोट शहर येथे दाखल गुन्ह्याचा (कलम ३,२५ आर्म ॲक्ट सहकलम १३५ मपोका) तपास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा अकोला व अकोट पोलीस यांनी आज ६ फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) येथुन तिन इसमांना ताब्यात घेतले. त्यांचे कडुन एक देशी कटटा, ०२ मॅक्झीन व ०५ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील कायदेशिर तपास सुरू आहे.


कार्यवाही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सहायक पोलीस अधिक्षक अकोट अनमोल मित्तल, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  शंकर शळके, पोलीस निरीक्षक अकोट शहर  संजय खंदाडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कैलास भगत, पो.उपनि राजेश जवरे, पो.उपनि. अख्तर शेख, पो.हे.कॉ. उमेश पराये, सुलतान खॉ. पठान, चंद्रप्रकाश सोळंके, ना.पो.कॉ. वसीमोददीन, पो.कॉ. सागर मोरे, विशाल हिवरे, मनिष कुलट, मोहम्मद आमिर यांनी केली.



दरम्यान, तीन दिवसापूर्वीच याच प्रकरणात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या मुळ अकोट येथील तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली होती.  शुभम लोणकर असं या तरुणाचे नाव आहे. शुभम आणि त्याच्या दोन साथीदारांना अवैधरित्या देशी बंदुक बागळण्याप्रकरणी पोलीसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून दोन देशी पिस्टलसह ९ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले होते. तर आज याच प्रकरणात तीन इसमांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून एक देशी कटटा, दोन मॅक्झीन आणि पाच जिवंत काडतुस जप्त केले आहे.




लॉरेन्स बिष्णोई याचे विदर्भात लागेबांधे असल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे. लॉरेन्स बिष्णोई सारख्या कुख्यात गँगस्टर याचे विदर्भात धागेदोरे असण्यामागचा उद्देश काय? हे शोधणे आता अकोला पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.




संबंधित वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा: गॅंगस्टर लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईच्या संपर्कातील शुभम लोणकरला अटक ; 2 देशी पिस्टलसह 9 जिवंत काडतुस जप्त


टिप्पण्या