gangster-lawrence-bishnoi-akl: गॅंगस्टर लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईच्या संपर्कातील शुभम लोणकरला अटक ; 2 देशी पिस्टलसह 9 जिवंत काडतुस जप्त




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या मुळ अकोट येथील तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली.  शुभम लोणकर असं या तरुणाचे नाव आहे. शुभम आणि त्याच्या दोन साथीदारांना अवैधरित्या देशी बंदुक बागळण्याप्रकरणी पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्टलसह ९ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आरोपी लोणकर हा व्हिडीओ कॉल आणि ऑडीओ कॉल द्वारे अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचंही निष्पन्न झालं आहे. तर आरोपी शुभम लोणकर दुबईच्या गँगस्टरच्या संपर्कात असल्याचं त्याला आलेल्या इंटरनेशनल कॉलच्या माध्यमातून प्रथमदर्शनी तपासात दिसत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली.


रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निमंत्रित पत्रकार परिषदेत श्री बच्चन सिंह बोलत होते.






अकोट शहर पोलीसांची धडक कार्यवाही दोन देशी कट्ट्यांसह नऊ जिवंत राउंड जप्त



दिनांक १६.०१.२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे हे डि.बी. पथकासह पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याचे पुलाखाली केशरी रंगाची पल्सर मोटरसायकल घेवुन उभे असुन त्यांचेजवळ देशी कट्टा (अग्निशरत्र) आहे. वरून सदर इसमांजवळ जावुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ एक खाली मॅक्झीन मिळुन आल्याने त्यांना विचारपुस करून त्यांनी विहीरीत टाकलेले दोन देशी कट्टे व ०९ जिवंत राउंड विर एकलव्य आपतकालीन पथकाचे मदतीने पंचांसमक्ष विहीरीतुन काढुन यातील आरोपी अजय तुलाराम देठे वय २७ वर्ष रा. धोबीपुरा अकोट, प्रफुल्ल विनायक चव्हाण वय २५ वर्ष रा. अडगांव बु ता तेल्हारा जि. अकोला यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांचेविरूदध अप.क. ३१/२४ कलम ३,२५ आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. यातील दोन्ही आरोपी यांना १७/०१/२०२४ रोजी अटक करून त्यांचा न्यायालयकडुन २ दिवसांचा पीसाआर मीळाला. त्यांचे कडुन गुन्हयाचे तपासात मास्टरमाइंड असलेला तीसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर वय २५ वर्ष, रा. नेवरी ता. अकोट, जि. अकोला ह. मु. भालेकर वरती, वारजे, पुणे निष्पन्न करून त्याचा उजैन मध्यप्रदेश येथे जावुन शोध घेतला असता तो तेथुन पसार झाला. त्यानंतर त्यास भालेकर वस्ती, वारजे, पुणे येथुन ताब्यात घेवुन ३०/०१/२०२४ रोजी अटक करून त्यास  न्यायालय अकोट यांचेकडे हजर केले असता त्याचा ३ दिवस पिसीआर मिळाला होता. तपासा दरम्यान आरोपी शुभम लोणकर याचे मोबाईल वरून गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणा-या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडीओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे प्रथमदर्शनी दिसले. गुन्हयाचा पुढील सर्वतोपरी तपास सुरू असुन पुढील तपास पोलीस स्टेशन अकोट शहर व स्थानिक गुन्हे शाखा अकोला करीत आहे.




कार्यवाही पोलीस अधीक्षक अकोला  बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अनमोल मित्तल, सहा. पोलीस अधीक्षक, पो.नी. शंकर शेळके स्था.गु.शा. अकोला, पोलीस निरीक्षक  तपन कोल्हे, पोलीस स्टेशन अकोट शहर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नी. कैलास भगत, पो.उपनि. राजेश जवरे, पो.उपनि. अख्तर शेख, पो.उपनि. गोपाल जाधव, पो.हे.कॉ. चंद्रप्रकाश सोळंके , पो.कॉ. विशाल हिवरे , पो.कॉ. मनिष कुलट , पो.कॉ. प्रेमानंद पचांग , पो.कॉ. रवि सदांशिव बन , पोकॉ. सागर मोरे , पोकॉ.कपील राठोड, पोहेकॉ. अब्दुल माजीद, पो.ना., वसीमोददीन, व चालक वासुदेव धर्म, चालक पोकॉ संदीप तायडे  यांनी केली.







टिप्पण्या