भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: रघुवीर समर्थ मठ व ज्ञानेश्वर मंदिर संस्थान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शुक्रवार १३ ते सोमवार १६ फेब्रुवारी कालावधीत दासनवमी उत्सवाचे आयोजन केले आहे.
१३ ते १५ फेब्रुवारी कालावधीत किर्तनकार समीर लिमये यांच्या उपस्थितीत ३ दिवसांचे दासबोध शिबीर आयोजित केले आहे.
सोमवार १६ फेब्रुवारी रोजी "समर्थ छंद” समर्थ गीतांचा कार्यक्रम डॉ. गीताली पांडे (पुंडकर) भगिनी आणि सहकारी सादर करणार आहेत.
सर्व कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत असून,'पसायदान' सभागृह (ज्ञानेश्वर मंगल कार्यालय) जोगळेकर प्लॉट, डाबकी रोड, जुने शहर अकोला येथे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसह कार्यक्रम होतील.
या कार्यक्रमाचा लाभ युवक व युवतींनी अवश्य घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा