money embezzlement case CIDCO: सिडको मध्ये खोटी नियुक्तीपत्र देवून पैशाचा अपहार प्रकरण: तात्पुर्ता प्रवासी अटकपुर्व जमानत अर्ज मागे

file photo 




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोट (अकोला): मुंबई सिडको मध्ये रु. २,८१,९३,४३४/- रुपयांच्या घोटाळ्यामध्ये अकोट सत्र न्यायालयातील तात्पुर्ता प्रवासी अटकपुर्व जमानत अर्ज मागे तर दुसऱ्या अर्जाची सुनावणी ५ जुन २०२३ रोजी ठेवण्यात आली आहे.




अकोट येथिल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बाविस्कर यांच्या न्यायालयात सिबीडी पोलीस ठाणे नविमुंबई या ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७५/२०२३ भादवि कलम ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४७१,४७४ (३४) ज्यामध्ये एकुण २,८१,९३, ४३४/- रुपये रकमेचा अपहार केल्याची तक्रार महाव्यवस्थापक सिडको बेलापुर नविमुंबई यांनी सिडको मधील सहाय्यक कार्मिक अधिकारी (आस्था) सागर मदनलाल तापडीया यांचे विरुध्द दाखल केली की, ज्या इसमांची सिडको मध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्ती झालेली नसतांना त्यांच्या नावे सिडकोच्या लेखा विभागातुन वेतन अदा करण्यात आले व त्याची पडताळणी केली असता यामध्ये एकुण २८ व्यक्तीच्या नावाने खोटी नियुक्ती पत्रे तयार करुन स्कॅन केलेली स्वाक्षरी वापरुन ती लेखा विभागात वेतन अदा करण्यासाठी आढळली व सदर इसमांच्या हजेरी पटाची खोटी कागदपत्रे तयार करुन ते लेखा विभागास सादर केल्याचे दिसुन आले. तसेच या प्रकरणात सरकार तर्फे म्हणजेच सिबीडी बेलापुर पोलीस ठाणे जि. ठाणे नविमुंबई यांचे तर्फे सरकारी वकील ॲड. अजित देशमुख यांनी अकोट सत्र न्यायालयात युक्तीवाद केला की, एकंदरीत केलेल्या चौकशी मध्ये सन २०१७ ते आज मिती पर्यंत २८ इसमांना आरोपी सागर तापडीया यांनी सिडको मध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्त केल्याचे खोटे कागदपत्रे तयार करुन लेखा विभागास सादर करुन सिडको मध्ये एकुण २,८१,९३, ४३४/- रकमेचा अपहार करुन सिडकोची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे तक्रार देण्यात आली. 




तपासा दरम्यान या प्रकरणात पोलीसांनी तेल्हारा येथिल निर्मल उज्वल क्रेडीट को-ऑप सोसायटी तेल्हारा जि. अकोला चे शाखा व्यवस्थापक नंदकिशोर गुंजाळे यांना देखील अटक केली होती. तसेच तेल्हारा येथिल या सोसायटी मधील एकुण ६ कर्मचाऱ्यांनी देखील तात्पुर्ता प्रवासी जमानत मिळण्याकरीता अकोट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो यापुर्वी अर्जदार कर्मचाऱ्यांनी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. अजित देशमुख यांचा युक्तीवाद झाल्यानंतर मागे घेतला. तसेच या प्रकरणात तेल्हारा तालुका दहिगांव येथिल दिनेशचंद्र गुप्ता यांनी देखिल बेलापुर सत्र न्यायालयात अटक पुर्व जामीन मिळण्याकरीता ७ दिवसांचा प्रवासी अटकपूर्व जामीन वरील प्रकरणात मिळण्याकरीता अकोट सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असुन यामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी सिबीडी पोलीस ठाणे नविमुंबई पोलीस उपनिरिक्षक निलेशकुमार जगताप यांनी दिलेल्या लेखी माहीती वरुन अकोट सत्र न्यायालयात युक्तीवाद केला की, अर्जदार दिनेशचंद्र गुप्ता हे मंगलमुर्ती अर्बन निधी तालुका तेल्हारा या शाखेचे चेअरमन असुन नमुद शाखमध्ये या गुन्ह्यामध्ये पाहीजे असलेला आरोपी सागर तापडीया याने या गुन्ह्यातील २८ बनावट कंत्राटी कामगारापैकी बऱ्याच कामगारांचे बनावट खाते अटक आरोपी नंदकिशोर गुंजाळे व अर्बन निधीचे मॅनेजिंग डायरेक्टर पाहीजे असलेले आरोपी मनिषकुमार दिनेशचंद्र गुप्ता यांच्या सहकार्याने ओपन केले आहेत. तसेच सदर सिडको महामंडळाची फसवणुक केलेली रक्कम त्यांनी मंगलमुर्ती अर्बन निधी या संस्थेतुन काढलेली आहे. आरोपीकडे सखोल तपास करणे बाकी आहे, असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. या प्रकरणात पुढील तारिख ०५ जुन  ठेवण्यात आलेली आहे. 



अकोट सत्र न्यायालयात या प्रकरणात तेल्हारा येथिल ज्या सर्वांनी तात्पुर्ता प्रवासी अटक पुर्व जामीन मिळण्याकरीता अर्ज दाखल केले. त्यांना सिबीडी पोलीस ठाणे नवि मुंबई यांचेकडुन वरील गुन्ह्याचे तपास कामी हजर राहणेबाबत लेखी सुचना फक्त देण्यात आली होती. या प्रकरणाचा संपुर्ण तपास पोलीस उपनिरिक्षक निलेशकुमार जगताप सिबीडी पोलीस ठाणे नविमुंबई हे करीत आहेत. त्यामुळे वरील प्रकरणात सखोल तपास सुरु असल्याने कोणा कोणाचा सहभाग गुन्ह्यामध्ये आहे हे तपासामध्ये निष्पन्न होईल. वरील गुन्ह्यामध्ये फिर्यादी म्हणुन सिडको नवीमुंबई चे महा व्यवस्थापक (हाऊसिंग ) / व्यवस्थापक (कार्मिक) अभियंता फैयाज अहमद अब्दुल हमिद खान यांनी या अपहार प्रकरणी लेखी तक्रार सिबीडी पोलीस ठाणे नविमुंबई येथे दिल्यावरुन वरील गुन्हा दाखल  केला आहे.

टिप्पण्या