- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
C-K-Nayudu-Tournament-2022: सी.के.नायडू स्पर्धा 2022: 25 वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा; अकोल्याच्या तीन खेळाडूंचा समावेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: विजयवाडा येथे 22 मार्च पासून सुरु होणाऱ्या चार दिवसीय कर्नल सी.के. नायडू क्रिकेट स्पर्धेकरिता 25 वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली असून, अकोला क्रिकेट क्लबचे खेळाडू आदित्य ठाकरे, नयन नन्हाण व गणेश भोसले या तीन खेळाडूंचा विदर्भ संघात समावेश आहे.
विदर्भाचा पहिला सामना चंडीगड संघासोबत असून विदर्भ संघ 17 मार्च रोजी विजयवाडा करता रवाना झाला आहे.
आदित्य ठाकरे
मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे याने यापूर्वी 16 व 19 वर्षाखालील विदर्भ संघ तसेच न्यूझीलंड येथे झालेल्या 19 वर्षांखालील विश्व चषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. नुकतेच तसेच 23 वर्षाखालील भारतीय संघाचे सुद्धा प्रतिनिधित्व केले असून रणजी व इराणी ट्रॉफीचे प्रतिनिधित्व केले आहे.
नयन चव्हाण
शैलीदार फलंदाज तसेच फिरकीपटू नयन चव्हाण याने यापूर्वी 14, 16, 19 व 23 वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच 19 वर्षांखालील भारतीय रेड संघाचे सुद्धा प्रतिनिधित्व केले आहे.
गणेश भोसले
गणेश भोसले हा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज असून, यापूर्वी गणेशने 16 व 19 वर्षांखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले असून,16 वर्षाखालील मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षी सय्यद मुश्ताक अली व विजय हजारे स्पर्धेचे प्रतिनिधीत्व केले आहे.
"विदर्भ संघात एकाच क्लबच्या तीन खेळाडूंची निवड होणे, ही अत्यंत अभिमानाची बाब असून अकोला जिल्ह्यातील युवा क्रिकेट खेळाडू करिता प्रेरणादायी आहे."
भरत डिक्कर
व्ही.सी.ए. जिल्हा संयोजक
तथा
अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा