- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola sport:BAnews24 impact: खेळाडू मोहित व आदित्यचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलं कौतूक; लवकरच होणार कौतूक सोहळा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Two players from Chhatrapati Shivaji Shooting Range qualify for the national tournament
नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: गुजरात येथे झालेल्या शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये अकोल्याच्या दोन शूटरने सुवर्णवेध घेत राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित केले. या खेळाडूंचे पालकमंत्री बच्चू कडु यांनी कौतूक केले असून, अकोल्याचे नाव देशपातळीवर उज्वल केल्याबद्दल मोहित लांडे आणि आदित्य सावरकर या दोन खेळाडूंचा कौतूक सोहळा लवकरच आयोजित केला जाणार आहे.
येत्या अकोला दौऱ्यात करणार खेळाडूंचा सत्कार
'भारतीय अलंकार न्यूज 24' ने आज दुपारी 'छत्रपती शिवाजी शूटिंग रेंजचे दोन खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेकरिता पात्र; मोहित लांडे व आदित्य सावरकरनी राखले अकोल्याचे वर्चस्व' या मथळ्याखाली मोहित आणि आदित्यच्या यशाचे वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त दस्तुरखुद्द पालकमंत्री बच्चू कडू यांनी वाचले. आणि लगेच आपल्या स्वीय सचिव यांच्या मार्फत भारतीय अलंकार न्यूज 24 शी संपर्क साधून, खेळाडूं आणि प्रशिक्षक यांची माहिती घेवून, खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे कौतूक केले. येत्या अकोला दौरा दरम्यान दोन्ही खेळाडूंचे आणि प्रशिक्षक यांचे प्रत्यक्षात कौतूक करून गौरविण्यात येणार असल्याचेही सांगितले.
प्रशिक्षक विंसेंट अमेर यांनी मानले आभार
" 'भारतीय अलंकार न्यूज 24' ने खेळाडूंच्या यशाचे कौतूक करीत बातमी प्रकाशित केल्यामुळे पालकमंत्री ना. बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यत ही बाब गेली. पालकमंत्री कडू यांनी या बातमीची लगेच दखल घेतली. मुलांच्या कामगिरीचे कौतूक केले. यामुळे आता अकोल्यात रायफल शूटिंग खेळाला चांगले दिवस येतील,अशी आशा पल्लवीत झाली आहे. तसेच मागील कित्येक वर्षांपासून शूटिंग रेंजचे काम थंड बसत्यात आहे, ते आता निश्चितच पूर्णत्वास जाईल. पालकमंत्री बच्चू कडू यांनी खेळाडू मुलांचे कौतूक केल्याने खेळाडूंना नवउर्जा प्राप्त झाली आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी मुलांचे कौतूक केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि भारतीय अलंकारने मुलांचे यश प्रत्येक घटकापर्यंत पोहचविल्या बद्दल मी आभारी आहो."
विंसेंट अमेर
प्रशिक्षक
मोहित लांडे व आदित्य सावरकर राष्ट्रीय संघात
नॅशनल रायफल असोसिएशन इंडीयाच्या वतीने अहमदाबाद (गुजरात) येथे १५ ते १९ ऑगष्ट या कालावधीत आयोजित आठव्या वेस्ट झोन शूटींग चँपियनशिप स्पर्धेत अकोला येथील छत्रपती शिवाजी शूटिंग रेंजचे दोन खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेकरिता पात्र ठरले.
या स्पर्धेत मोहीत पुरूषोत्तम लांडे याने ४०० पैकी ३८८ पॉईंट व आदित्य प्रविणराव सावरकर याने ४०० पैकी ३८३ पॉईंट घेऊन राष्ट्रीय स्पर्धेकरीता आपले स्थान निश्चित केले.भारतीय अलंकार. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व सैन्य दलातील खेळाडू सहभागी झाले होते. खेळाडूंच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी अकोल्याचे शूटींग मधील वर्चस्व कायम ठेवले. आदित्य सावरकर याने याआधी ही शालेय क्रीडा स्पर्धेत २०१८ साली सुवर्णपदक पटकावले होते. खेळाडूंना प्रशिक्षक विन्सेंट अमेर, मार्गदर्शक विलास हरणे, क्रीडा शिक्षक प्रशांत पावडे ,मिलींद लांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
हे सुद्धा वाचा:याच बातमीची पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली दखल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा