- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola sport news: Exclusive: छत्रपती शिवाजी शूटिंग रेंजचे दोन खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेकरिता पात्र; मोहित लांडे व आदित्य सावरकरनी राखले अकोल्याचे वर्चस्व
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: नॅशनल रायफल असोसिएशन इंडीयाच्या वतीने अहमदाबाद (गुजरात) येथे १५ ते १९ आॅगष्ट या कालावधीत आयोजित आठव्या वेस्ट झोन शूटींग चँपियनशिप स्पर्धेत अकोला येथील छत्रपती शिवाजी शूटिंग रेंजचे दोन खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेकरिता पात्र ठरले.
मोहित लांडे व आदित्य सावरकर राष्ट्रीय संघात
या स्पर्धेत मोहीत पुरूषोत्तम लांडे याने ४०० पैकी ३८८ पॉईंट व आदित्य प्रविणराव सावरकर याने ४०० पैकी ३८३ पॉईंट घेऊन राष्ट्रीय स्पर्धेकरीता आपले स्थान निश्चित केले.भारतीय अलंकार.या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व सैन्य दलातील खेळाडू सहभागी झाले होते. खेळाडूंच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी अकोल्याचे शूटींग मधील वर्चस्व कायम ठेवले. आदित्य सावरकर याने याआधी ही शालेय क्रीडा स्पर्धेत २०१८ साली सुवर्णपदक पटकावले होते.
खेळाडूंना प्रशिक्षक विन्सेंट अमेर, मार्गदर्शक विलास हरणे, क्रीडा शिक्षक प्रशांत पावडे ,मिलींद लांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल अक्षय यन्नावार, अंकुश डोंगरे, प्रकाश चतरकर, एजाज अहमद, राजेश देशमुख, राजेश बढे, मायकल अमेर, संग्राम राजूरकर, वैजनाथ कोरकने, शशिकांत गायकवाड, देवानंद मोरे, किशोर उजाडे, श्याम कुलट, सुनील माणिकराव, राधिका बढे यांचेसह अनेक क्रीडाप्रेमी पालकांनी तसेच खेळाडूंनी त्यांचे कौतूक केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा