Amendment of curfew order: Akola: संचारबंदी व जमावबंदी आदेशात सुधारणा; जाणून घ्या नवी नियमावली




भारतीय अलंकार 24

अकोला, दि.९: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्‍यामुळे शुक्रवार दि.  ३० एप्रिल २०२१  पर्यंत  संचारबंदी व जमावबंदीचे आदेश दि.५रोजी निर्गमित करण्‍यात आले आहेत. या आदेशात खालील  प्रमाणे सुधारणा करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.


त्यानुसार या आदेशात अत्‍यावश्‍यक सेवेमध्‍ये खालील बाबींचा समावेश करण्‍यात आला आहे.


a. पेट्रोल पंप व पेट्रोलियम संबंधीत उत्‍पादने


b. कार्गो सर्व्‍हीसेस


c. डेटा सेंटर्स / क्‍लाऊड सर्व्‍हीस प्रोव्‍हायडर/ आय.टी. सर्व्‍हीसेस सपोर्टींग क्रिटीकल  इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर अन्ड सर्व्‍हीसेस.


d. शासकीय / खाजगी सुरक्षा सेवा.


e. फळ विक्रेता.


f. ऑप्‍टीकल्सचे दुकाने


१. खालील खाजगी आस्‍थापना व कार्यालये सकाळी सात  ते रात्री  आठ वाजे दरम्यान पूर्ण आठवड्याचे पूर्ण दिवस सुरु ठेवण्‍यास  परवानगी राहील.   मात्र कार्यालयामध्‍ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. कोविड लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी कोविड-१९ RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. दि.१० पासून याची अंमलबजावणी केली जाईल. उल्‍लंघन  करणाऱ्या व्यक्तीस एक हजार रुपये  दंडाची  आकारणी  करण्यात येईल.


a) SEBI तसेच SEBI मान्‍यताप्राप्‍त  संस्‍था जसे की, स्‍टॉक मार्केट, डिपॉजीट आणि क्लियरींग  कॉर्पोरेशन्‍स.


b)रिझर्व्‍ह बॅंकेच्‍या नियंत्रणाखालील संस्‍था, प्रायमरी डिलर्स, CCIl, NPCI, Payment System operators , Financial market participants operating In RBI regulated markets.


c) सर्व  नॉन बॅंकिंग वित्‍तीय महामंडळे.


d) सर्व मायक्रो फायनन्‍स संस्‍था


e) सर्व वकिलांची कार्यालये / चार्टड  अकाऊंट यांची कार्यालये


f) कस्‍टम हाऊस एजन्‍टस् , परवानाधारक मल्‍टी मोडल  ट्रान्‍सपोर्ट ऑपरेटर ( लस, औषधी, जीवनरक्षक,  औषधांशी  संबंधीत वाहतूक .


२.ज्‍या व्‍यक्‍ती रात्री  ८ ते सकाळी ७ या वेळेत रेल्‍वे,  बसेस,विमानाने  आगमन किंवा प्रस्‍थान करणार असेल त्‍याला अधिकृत तिकीट बाळगणे गरजेचे आहे. जेणे करुन संचारबंदीचे कालावधीत संबंधीत स्‍थानकापर्यंत किंवा घरी  प्रवास करता येईल. 


३.औद्योगिक ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना खाजगी बस / खाजगी वाहनाने त्‍यांच्‍या ओळखपत्राचे आधारे  रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कामाच्‍या ठिकाणी शिफ्ट नुसार येणे-जाणे  करता येईल.


४.प्रार्थना स्‍थळे  सध्या संपूर्णपणे नागरीकांसाठी बंद आहेत, फक्त प्रार्थना स्‍थळांचे  ठिकाणी सेवा देणारे  कर्मचारी आपली कर्तव्‍ये पार पाडू शकतील. एखाद्या धार्मिक स्‍थळी विवाह किंवा अंत्‍य संस्‍कार असेल तर दिनांक ५/४/२०२१ चे आदेशामध्‍ये  नमूद केलेल्‍या नियमांचे पालन करण्‍याचे


५.अटी व शर्तीनुसार तहसिलदार यांचेकडून परवानगी देण्‍यात येईल.


६.विद्यार्थ्‍याला प्रत्‍यक्ष परीक्षा देण्‍याकरिता मुभा राहील. मात्र  रात्री ८ वाजेनंतर घरी परत प्रवास करतांना वैध हॉल टिकीट बाळगणे आवश्‍यक राहील.


७. संचारबंदीच्‍या कालावधीमध्‍ये लग्‍नाचे आयोजन करण्‍यात आले असल्‍यास, परिस्थिती लक्षात घेवून स्‍थानिक  व्‍यवस्‍थापन प्राधिकारी   यांचेकडून दिनांक ५/४/२०२१ चे आदेशामध्‍ये  नमूद केलेल्‍या नियमांचे पालन करण्‍याचे अटी व शर्तीनुसार  परवानगी देण्‍यात येईल.


८. घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्‍वयंपाकी  यांना रात्री आठ नंतर येणे जाणे करण्‍याच्‍या बाबतीत स्‍थानिक आपत्‍ती प्राधिकरण परिस्थितीनुरुप परवानगी देईल. 



 हे आदेश दि.३० एप्रिल २०२१  रात्री ११.५९ वा.पर्यंत  संपूर्ण अकोला  शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील,असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या