- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
robotics-competition-malaysia: ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची जागतिक भरारी; मलेशियातील रोबोटिक्स स्पर्धेत भारताला सुवर्णपदक!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दि सेंट जोफेस इंग्लीश स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मलेशिया येथे पार पडलेल्या 'रोबो वंडर वर्ल्ड समिट' या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील हातोला या छोट्याशा गावात ग्रामीण भागातील दि सेंट जोसेफ इंग्लीश स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी ७६ देशांना मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले आहे, अशी माहिती शाळेच्या प्राचार्या रचना गोरडवार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या यशाबद्दल बोलताना प्राचार्य गोरडवार म्हणाल्या की, एआय आणि रोबोटिक्स हे भविष्यातील महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. हे ज्ञान केवळ शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला या यशामुळे एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली असून, सर्व स्तरांतून या विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. मलेशियामध्ये आयोजित या स्पर्धेसाठी तयारी करताना आणि अगदी मलेशियात पोहोचल्यावर हे सुवर्णपदक प्राप्त करण्यापर्यतचा सर्व खडतर प्रवास रचना गोरडवार यांनी यावेळी कथन केला.
ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या मुलांना सर्व सोयीसुविध पुरविण्यासोबतच आजच्या एआयच्या जगात त्यांना तग धरता यावा यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देता आले यासाठी त्यांनी आनंद व्यक्त केला. येथून पुढेही या ग्रामीण विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी आपण झटणार असल्याची ग्वाही रचना गोरडवार यांनी यावेळी दिली.
विनोद देशमुख यांनी आपल्या प्रस्तावनेत शाळेची सविस्तर माहिती देत आतापर्यतच्या यशाचा आलेख सादर केला. तर सुमेर चव्हाण यांनी रोबोटिक्सबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी शाळेतील इतर शिक्षक आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.
शेतकर्यांच्या मुलांची ऐतिहासिक कामगिरी
बार्शीटाकळी तालुक्यातील हातोला येथील दि सेंट जोसेफ स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यानी पहिल्यांदाच अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करीत ही उत्तुंग भरारी घेतली आहे. इयत्ता ५ वी आणि ६ वी मध्ये शिकणार्या राबिया लखानी आणि विराट काळदाते या दोन चिमुकल्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे सुवर्णपदक देशाच्या नावावर केले.
एआय आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यानी एआय आणि सेन्सर पद्धतीचा वापर करून जगातील विविध समस्यांवर उपाय शोधणारे उत्कृष्ट प्रोजेक्ट सादर केले. ७६ देशांतील स्पर्धकांमध्ये भारतीय विद्यार्थ्याच्या या प्रकल्पाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रथम क्रमांक पटकाविला. शाळेच्या प्राचार्य रचना वसंत गोरडवार यांच्या अथक प्रयत्नातून आणि दूरदृष्टीमुळे या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर पोहोचता आले.
रचना गोरडवार गीता फोगाट यांच्याहस्ते सन्मानित
मलेशियातील या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्राचार्या रचना गोरडवार यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी प्रख्यात कुस्तीपटू गीता फोगाट यांच्याहस्ते वर्ल्ड स्कूल सम्मीटच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सोशल अॅण्ड इमोशनल लर्निग सेल लिडरशीप’ अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही रचना गोरडवार यांना विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सेंट जोफेस स्कूल
हातोला
global achievement
gold medal
in Malaysia
India wins
robotics competition
rural student
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा