Akola crime: Murder case: चोरीचा संशय बळावला अन मजुराचा झाला घात; अवघ्या काही तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात



भारतीय अलंकार 24

अकोला : खदान पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौक परिसरात शनिवारच्या रात्री दगडाने ठेचून एका इसमाची हत्या करण्यात आली असल्याची घटना उशिरा रात्री उघडकीस आली. या घटनेतील आरोपी अज्ञात होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखा व खदान पोलिसांनी तपास चक्रे वेगात फिरवून अवघ्या काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले.




आरोपीचे नाव सुमितकुमार राजेशकुमार शर्मा असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शर्मा हा उत्तर प्रदेश मधील रामपुर येथील मूळ निवासी आहे. नेहरू पार्क परिसरात तो रस्त्याच्या कडेने बसून व्यवसाय करतो. आपल्या दुकानात मृतक श्याम हा चोरी करत असल्याचा संशय आरोपी सुमित याच्या मनात बळावला. याच संशयातून हे हत्याकांड घडले, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.



शनिवारी रात्री खदान पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौकात एका ३५ वर्षीय इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. 




मृतक इसमाचे नाव श्याम शंकर घोडे असून, तो  गवंडीकाम मजुरी काम करत होता. तसेच खदान परिसरातील सरकारी गोडावून मागे त्याचे घर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, तेथे चीलम व छापे आणि दगड आढळून आला होता. 

प्रथम दर्शनी ही हत्या व्यसनातून करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी लगेच आपल्या यंत्रणा कामाला लावून, आरोपी पर्यंत पोहचण्यास यश मिळविले. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून,त्याची चौकशी सुरू आहे.


हे सुध्दा वाचा: Akola crime: नेहरू पार्क चौक परिसरात एकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपींचा शोध सुरू

टिप्पण्या