Akola crime: नेहरू पार्क चौक परिसरात एकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपींचा शोध सुरू



भारतीय अलंकार 24

अकोला : खदान पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौक परिसरात शनिवारच्या रात्री दगडाने ठेचून एका इसमाची हत्या करण्यात आली असल्याची घटना उशिरा रात्री उघडकीस आली. या घटनेतील आरोपी हे अज्ञात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.



शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, कोरोना संकट काळातही गुन्हेगारी पोलिसांकरिता डोकेदुखी ठरली आहे. शनिवारी रात्री खदान पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौकात एका ३५ वर्षीय इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. 




पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार  इसमाचे नाव श्याम शंकर घोडे असून, तो गवंडीकाम करत होता. तसेच खदान परिसरातील सरकारी गोडावून मागे त्याचे घर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपी फरार असून, खदान पोलीस शोध घेत आहेत.




घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, तेथे चीलम व छापे आढळून आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रथम दर्शनी ही हत्या व्यसनातून करण्यात आली असावी,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या