Political news: राजकारण: राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज- जयंत पाटील





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: वीज बिलाच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपात काही तथ्य नाही. राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज असल्याने असे बेफाम आरोप करण्याची त्यांना गरज असल्याचं राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील म्हणाले.


आज अकोला जिल्ह्यात जलसंपदा विभागा अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांचा ना पाटील यांनी आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी पाटील यांनी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते.


नाना पटोले यांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत,असे स्पष्ट करून, विधानसभा अध्यक्षपदाबाबत बदललेल्या परिस्थितीत तिन्ही पक्ष चर्चा करून निर्णय घेतील, असं म्हणत पाटील यांनी अध्यक्षपदाबाबत गुढ आणखी वाढवलं.


देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिगत गांभीर्याने घेतो.मात्र, त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेत नाही,असे देखील एका प्रश्नाच्या उत्तरात पाटील म्हणाले.


राज्यातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. मात्र रि डिझाइन करण्यासाठी हे प्रकल्प थांबलेले आहेत.अकोल्यातील नेरधामणा प्रकल्प देखील नाविन्यरित्या पूर्ण करण्यासाठी थांबलेला आहे. लवकरच प्रकल्प पूर्णत्वास जाणार,असे पाटील म्हणाले.


लोकांचे समर्थन दिल्लीच्या आंदोलनाला आहे. केंद्र सरकारने १५ रुपये दरवाढ केली.आमचे सरकार असताना ५० पैसे जरी दरवाढ झाली तरी स्मृती इराणी ताई रस्त्यावर यायच्या. प्रकाश जावडेकर माध्यमासमोर यायचे.केंद्र सरकारने २७ ते २८ कोटी  रुपये जीएसटीचे दिले नाहीत. केंद्र सरकार पेट्रोल दरवाढ करून आपली तिजोरी भरते. पण महाराष्ट्राला काही देत नाही.महाराष्ट्राशी हा दुजाभाव का,असा सवाल देखील पाटील यांनी केला.


हे सुद्धा वाचा: सद्यस्थितीत सुरु असलेल्या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद -जयंत पाटील

टिप्पण्या