Akola:BJP: पशुधन विकास मंडळ मुख्यालय वाचविण्यासाठी भाजपा उतरली रस्त्यावर; कार्यालयाला ठोकले कुलूप, कार्यकर्त्यांना अटक





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  शहरात असलेले सरकारी कार्यालय हटविण्याचे महापाप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार करत असून, अकोल्यात आज राष्ट्रवादीचे मंत्री असताना देखील अकोल्यात २००२ पासून असलेलं महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ मुख्यालय नागपूरला हलवण्याचा निर्णय घेतला. निर्णय होवून दोन दिवसही उलटले नाहीतर कार्यालायातील सामान हलविण्याचे काम महाविकास आघाडी करीत होते. सामान ट्रक मध्ये नेत असताना, या कृतीचा अकोला भारतीय जनता पक्षाने जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात आज स्थानिक जुने आरटीओ रोड गोरक्षण रोड येथे कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार निदर्शने करण्यात आले. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. 


जिल्हा भाजपा माजी अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी निदर्शने दिली. तसेच राज्य शासनाचा कुटिल डाव हाणुन पाडला. आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांना माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विकास महामंडळातील कार्यालयाचा सामान हलवण्याचा प्रयत्न सुरू असताना रविवारी सुट्टी असताना हा प्रकार व तातडीने सामान हलवण्याची खरंच गरज आहे का असा सवाल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार सावरकर यांनी उपस्थित करून,  भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारचा हा प्रकार निषेध करण्याचा निर्देश दिले. 



भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब सामानाची वाहतूक करण्यासाठी तिथे उभे असलेले ट्रक हलवण्यास भाग पाडले. कार्यालयाला टाळा ठोकला. 



हे आंदोलन प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी गिरीश जोशी, मनीराम टाले, माधव मानकर, एडवोकेट देवाशीष काकड, संतोष पांडे, गणेश अंधारे, मनोज शाहू ,अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, प्रशांत अवचार, आकाश ठाकरे, अभिजीत कडू, देवेंद्र तिवारी, डॉक्टर गौरव शर्मा, बन्सी चव्हाण, विकी ठाकूर, गणेश सपकाळ ,राजे शिंदे, मनिष बाछुका, मनिष बुंदिले, रंजीत खेडकर, ओम कसले, विवेक देशमुख, संदीप गावंडे, अभिमन्यू नवकार, नकुल तोडकर, आशिष गिरी, राजेश शर्मा, अमित चौधरी, सुमित खाचणे, आकाश टाले, आनंद देशमुख ,श्रीकांत लोणकर, गोपाळ सोनवणे, प्रदीप टाले ,संतोष देशमुख ,संजय गोटेफोडे आदी भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


कार्यकर्त्यांना अटक;आघाडी सरकारचा कुटील डाव


यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून निषेध व्यक्त केला. खदान पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांना अटक केली. या घटनेचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून लोकशाही मधील विरोधकांचा आवाज दाबण्याचा कुटील डाव सरकार करीत असेल तरी जनतेच्या समस्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर येऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी दिली.  


राज्य शासन आणि सरकारने निर्णय न फिरवल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन होईल, असा इशारा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांनी देवून, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते याविरोधात का बोलत नाही, दिल्लीत जावून राष्ट्रीयस्तरावर गप्पा करणाऱ्या करणारे सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठे गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या गप्प बसण्यामध्ये अकोल्यावर अन्याय  करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचा सहभाग आहे का असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित झाला आहे, असाही यावेळी आरोप प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात यांनी करून, भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता हा सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.


हे सुद्धा वाचा: महत्प्रयासाने खेचून आणलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याचा निर्णय

टिप्पण्या