ठळक मुद्दासिगारेट पिण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा चाकूने खून; पोलिसांची तत्पर कारवाई
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : डाबकी रोड परिसरात सिगारेट पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांच्या आत तीन आरोपींना अटक करून गुन्ह्याचा छडा लावला.
घटना नेमकी काय?
पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे बुधवार १८ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी शेख तनवीर शेख नासीर (वय १९, व्यवसाय वेल्डिंग) हा आपल्या मित्र मविस अमन मो. आजम याच्यासोबत डाबकी रोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या निराळे यांच्या पानपट्टीवर सिगारेट पिण्यासाठी गेला होता.
त्यावेळी तेथे अर्जुन नरेंद्र धनावत हा आरोपीही उपस्थित होता. सिगारेट पित असताना आरोपीने मृतक मविसला “तु मेरे तरफ क्या देख रहा?” असे म्हणत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपी अर्जुन धनावत व त्याचे दोन साथीदार यांनी मृतक व फिर्यादीला मारहाण केली.
दरम्यान, आरोपी अर्जुन धनावत याने मविसच्या पोटात चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या मविसचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला.
गुन्हा दाखल
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे गुन्हा क्रमांक २३४/२०२६ नोंद करण्यात आला.
हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३, ११५ (२) आणि ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः डाबकी रोड पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तपासाची सूत्रे हाती घेतली.
आरोपींचा शोध घेण्यासाठी एकूण ८ विशेष पथके तयार करण्यात आली
विविध पोलीस ठाण्यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय करण्यात आली
तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला
तपासादरम्यान खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने तीन आरोपींना शोधून काढत ताब्यात घेतले. आरोपी दुसऱ्या राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना दर्यापूर (अमरावती) येथून अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी
पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे:
अर्जुन नरेंद्र धनावत ठाकुर (वय २३) – रा. आश्रय नगर, डाबकी रोड, अकोला
अनिकेत संजय बाळापुरे (वय १८) – रा. रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला
विशाल दिलीप सिरसोले (वय २३) – रा. गायत्री नगर, बाळापूर रोड, अकोला
तीघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली:
पोलीस अधीक्षक – अर्चित चांडक
अपर पोलीस अधीक्षक – बी. चंद्रकांत रेड्डी
उपविभागीय पोलीस अधिकारी – सुदर्शन पाटील
तसेच या मोहिमेत
पोलीस निरीक्षक मनोज केदारे (पो.स्टे. खदान)
पोलीस निरीक्षक दीपक कोळी (पो.स्टे. डाबकी रोड)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे
यांच्यासह गिरीश विर, संदीप काटकर, भूषण मोरे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
ठळक मुद्दे
१.सिगारेट पिण्यावरून झालेल्या वादातून खून
२.तरुणावर चाकूने वार करून हत्या
३.अवघ्या ६ तासांत तीन आरोपी अटकेत
४.८ विशेष पथकांची मोहीम राबवली
५.तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पकडले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा