Shivsena Akola:अकोला शिवसेनेने मनपात घातला आयुक्तांच्या नावे गोंधळ;रात्रभर केले जागरण

घरकुल व महानगरपालिका जागेमधील व शासनाच्या जागेमधील सर्व लाभार्थ्याना घरकुलाचा लाभ देण्यात यावा 


अकोला: महानगरपालिकेत आयुक्तांच्या  यांच्या दालना समोर शिवसेनेने ठिय्या देत पारंपरिक पद्धतीने लोक कलावंतांच्या करवी आयुक्तांच्या नावे गोंधळ घालून,आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. शिवसैनिकांना आयुक्त भेटत नसल्याने मनपात आयुक्त येईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या उपेक्षांची जाण मनपा प्रशासनाला करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. रात्री सुध्दा आंदोलन सुरूच होते. शिवसैनिकांनी मनपा आयुक्त कार्यालय समोरच रात्री ठाण मांडून जागरण केले.



शिवसेनेचे सर्व नगरसेवक व तसेच प्रभागातील महिला यांचा आंदोलनात समावेश आहे.शिवसेना गटनेते राजेश मिश्रा व त्यांचे सहकारी सर्व नगरसेवक यांनी रात्री देखील आंदोलन सुरूच ठेवले.





कशासाठी आंदोलन

महानगरपालिका क्षेत्रामध्ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सुरु असलेल्या घरकुलामध्ये काही लोकांना गुंठेवारीची जागा असल्यामुळे घरकुल बांधण्याकरीता विलंब होत असून ते २००१ च्या पूर्वीचे गुंठेवारी मधील प्रकरणे आहेत. ते सर्व घरकुल व महानगरपालिका जागेमधील व शासनाच्या जागेमधील सर्व लाभार्थ्याना घरकुलाचा लाभ देण्यात यावा व भाडेकरी यांना सुध्दा घरकुलांचा लाभ देण्यात यावा, मागील ५ वर्षापासून शहरात घरकुल योजना ज्या गतीने व्हायला पाहीजे होती त्या गतीने न होता अत्यंत संथ गतीने ही योजना सुरु आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे जे लाभार्थी महानगरपालिका किंवा शासनाच्या जागेवर अनेक वर्षापासून राहत आहेत त्यांना त्या जागेचा मालकी हक्क देवून घरकुलाचा लाभ देण्यात यावा,अशी मागणी शिवसेनेने केली आहे.



महानगरपालिका हद्दीतील महापालिकेची स्वतःची जागा म्हणून शिवाजी नगर जुने शहर ,विजय नगर, तारफैल , वाल्मिक नगर जुने शहर , बापु नगर, अकोट फैल नायगांव ,अकोट फैल ,इंदिरा नगर ,शेलार फैल, नविन तारफैल (उत्तमचंदप्लॉट)  लोकमान्यनगर, गुरुदेव नगर , शिवसेना झोपडपट्टी (बाळापुर रोड चीटींग ग्राऊंड),  मणकर्णा प्लॉट ,चार जीन,नगर परिषद कॉलनी व शासनाच्या जागा,  सिंधी कॅम्प , रमाबाई नगर हरीहर पेठ, रमेश नगर, गोंड पुरा , कैलास टेकडी ,खोलेश्वर , बस स्टैंड आंबेडकर नगर ह्या व्यतिरीक्त ज्या शासनाच्या जागेवर लोक वास्तव्यास आहेत अशा जागेचा लीज पट्टा करुन मालकी हक्क देण्यात यावा.



जुने शहर भागात कमीत कमी २ लाख लोकवस्ती असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना व अनेक जातीपंथामध्ये त्यांना मृत्युनंतर दफन करण्याची पध्दत असल्यामुळे त्यांना गुलजार पुरा (फुकट पुरा) या भागात दफन करण्याची जागा असून, ती जागा अंदाजे ४ एकर असून सद्यास्थितीत तेथे ५ ते १० हजार फुट जागा शिल्लक असल्याने दफन विधी करता त्रास होत आहे व तेथील लोक दफन विधी करीता विरोध करत आहे. त्यामुळे अंत्यविधीकरिता नागरीकांना भटकावे लागत आहे. यामुळे रोष निर्माण होत आहे. तरी ती जागा मोकळी करुन महानगर पालिकेने ताब्यात घ्यावी. त्यावर कंपाऊंडची व्यवस्था करुन तेथे कर्मचारी नियुक्त करावा किंवा नविन जागा उपलब्ध करुन महानगरपालिकेने दफन विधीकरीता द्यावी. शिवसेनेने वारंवार पत्र देवून व सभागृहात हा विषय ठेवण्याचा प्रयत्न केला. तरी अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. तरी यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन लोकांना दफन विधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.



चांगला पाऊस झाल्यामुळे महान धरणा मध्ये जलसाठा १०० टक्के उपलब्ध आहे अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये अमृत योजने अंतर्गत नळ जोडणीची ९१ टक्के काम पूर्ण झाले असून सुध्दा नागरीकांना पिण्याच्या पाण्याकरिता २ दिवस वाट पहावी लागत आहे. तत्कालीन आयुक्त रो कडे  व दौलत पठाण यांनी अकोला शहराला १ दिवस आड पाणी पुरवठा सुरू केला होता. आता सर्व यंत्रणा वाढून सुध्दा लोकांना  टॅक्स वाढवून सुध्दा नियमाप्रमाणे पाणीपुरवठा का करु शकत नाही. यासर्व कारणामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता शहरामध्ये १ दिवस आड पाणीपुरवठा करण्यात यावा. अमृत योजनेत झालेल्या रस्त्याचे नुकसान लवकरात लवकर दुरुस्त करावे 


या मागण्यांसाठी ०२ नोव्हेंबर रोजी आयुक्त संजय कापडणीस यांचे दालनात ठिय्या आंदोलन सर्व शिवसेना नगरसेवक यानी आंदोलन केले.

आंदोलन  राजेश मिश्रा, मंजुषा शेळके, मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशीकांत चोपडे, अनिता मिश्रा,  प्रमिला गिते .सपना नवले आदींच्या नेतृत्वात करण्यात आले.



हे सुध्दा वाचा:मनपा आयुक्तच हजर नसल्याने शिवसेनेचे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित;मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल परत आंदोलन


आंदोलनचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा: शिवसेनेने घातला अकोला मनपात गोंधळ












टिप्पण्या