Shivsena Akola:मनपा आयुक्तच हजर नसल्याने शिवसेनेचे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित;मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल परत आंदोलन

ज्या कुंटुबाकडे  स्वमालकीची जागा नसेल व त्यांच्या कडे ताबा पावती असेल व ते अनेक वर्षापासुन मनपा हद्दीत नझुल च्या जागेत राहत असतील त्यांना शासकिय जागेचा मालकी हक्क देवून लिज पट्टा करुन सदर योजनेतुन घरकुलाचा लाभ द्यावा.





अकोला: शहरात अनेक वर्षांपासून राहत असलेल्या झोपडपट्टी वासीयांना  नियमानुसार राहता यावे, यासाठी त्याच्या नावे भाडेपट्टा लिहून द्यावा, अमृत योजने अंतर्गत शहरात झालेल्या रस्त्याचे नुकसानचे सिमेंटीकरण करणे, हिंदु स्मशानभूमीत दफन विधी करिता जागा मिळणे या व अन्य विविध प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी आज अकोला शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्त यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते.मात्र,आज आयुक्तच दालनात हजर न झाल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. परंतू या मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास  पुन्हा तारीख निश्चित करून शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल,अशी चेतावणी शिवसैनिकांनी आयुक्तांच्या नावे मनपास दिलेल्या पत्रात दिली आहे.





घरकुला करिता शिवाजी नगर जुने शहर , विजय नगर तार फाईल, वाल्मिक नगर जुने शहर ,बापू नगर आकोट फाईल, नायगाव, आकोट फेल,इंदिरा नगर ,शेलार फाईल ,नवीन तारफाईल, उत्तमचंद प्लॉट, लोकमान्य नगर ,गुरुदेव नगर , शिवसेना झोपडपट्टी, बाळापूर रोड, चिटींग ग्राउंड ,मनकर्णा प्लॉट,चारजिन, नगरपरिषद कॉलनी मध्ये वर्षानुवर्षे पासून राहत असलेल्या नागरिकांना आपल्या जागांचे लीज पट्टे मिळावे या करिता गटनेते तथा  नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १ वाजता  शिवसेना नगरसेवक गजानन चव्हाण ,मंगेश काळे,मंजुषा शेळके ,अनिता मिश्रा ,प्रमिला गीते ,शशी चोपडे, सपना नवले मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात ठिय्या आंदोलनास बसणार होते. 



शिवसेना, युवासेना, तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिकही आंदोलनात सहभागी होण्यास आले होते. आंदोलकांनी आयुकांची वाट बघितली परंतू, आयुक्त दालनात आलेच नाहीत. त्यामुळे  विविध मागण्या विषयी चर्चा होवू शकली नाही. यासाठी आंदोलकांनी आपले मागणी पत्र आयुक्तांच्या नावे आयुक्तांच्या खुर्चीवर ठेवून व हार वाहून, मनपा प्रशासनाकडे सोपविले. निवेदन पत्रात नमूद मागण्या त्वरित मंजूर न झाल्यास आंदोलनाची पुढील तारीख निश्चित करून शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल,असा गर्भित इशारा शिवसैनिकांनी अकोला मनपाला दिला आहे.



काय आहेत मागण्या



१. योजने मधील समाविष्ट गुंठेवारीच्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा.


२. घरकुल योजनेचे नगररचना विभागात प्रलंबित असलेले नकाशे मंजुर करुन बांधकाम पूर्ण करावे.


३. ज्या कुंटुबाकडे  स्वमालकीची जागा नसेल व त्यांच्या कडे ताबा पावती असेल व ते अनेक वर्षापासुन मनपा हद्दीत नझुल च्या जागेत राहत असतील त्यांना शासकिय जागेचा मालकी हक्क देवून लिज पट्टा करुन सदर योजनेतुन घरकुलाचा लाभ द्यावा.


४. शहरामधील पिढीजात वास्तव करीत असलेल्या अतिक्रमण धारकांना नियमा नुसार राहता जागेचा भाडेपट्टा करुन द्यावा 


५. दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ त्वरीत करुन द्यावा.


६. साफ-सफाई कर्मचारी यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.


७. ज्याच्याकडे स्वतःच्या नावाचा ७/१२, नमुना ड , कलेक्टर लेआऊट, एसडिओ लेआऊट, तहसिलदार लेआऊट अशा गुठेवारी जागा आहेत, अशा धारकांना नियम व अटी शितील करुन महानगर पालिकेत ठराव घेथून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.


८. लवकरात लवकर हिंदु स्मशान भुमीचा मार्ग मोकळा करण्यात यावा.




निवेदनावर मंजुषा शेळके नगरसेविका प्रभाग क्र. १०, अनिता मिश्रा नगरसेविका प्रभाग क्र. १७, मंगेश काळे नगरसेवक प्रभाग क्र. १४, प्रमिला गिते नगरसेविका प्रभाग क्र. १७, राजेश मिश्रा नगरसेवक प्रभाग क्र. १७, शशिकांन चोपडे नगरसेवक प्रभाग क्र. ९ यांच्या स्वाक्षरी आहेत.



टिप्पण्या