Sheetalamte: आत्महत्या करण्यापूर्वी शीतल आमटे समाज माध्यमावर होत्या सक्रिय;आपल्या चित्राद्वारे केल्या भावना व्यक्त!

Before committing suicide, Sheetal Amte was active on social media; expressing her feelings through her pictures

   Photo courtesy : Social media




भारतीय अलंकार

चंद्रपूर :  सोमवारी सकाळच्या सुमारास डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मात्र, आत्महत्येपूर्वी त्यांनी पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास आपल्या ट्विटर अकाउंटवर २९ नोव्हेंबर २०२० रोजी काढलेल्या एका पेंटिंगला 'War and Peace' #acrylic on canvas. 30 inches x 30 inches,असे शीर्षक देत पोस्ट केली. यावरून चित्रा वरून त्या अत्यंत मानसिक तणावात असल्याचे बोलल्या जात आहे.



ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या,  डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक वृत्ताने महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. प्राथमिक अंदाज नुसार शीतल आमटे काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या.  


ट्विट

   Photo courtesy : Social media

दरम्यान, सोमवारी त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर येण्यापूर्वी, सोमवारी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास शीतल आमटे यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी ऍक्रेलिक कॅनव्हास पेंटींगचा फोटो पोस्ट केला. या फोटोवर चित्राच्या खाली त्यांचे नाव आणि रविवार २९ नोव्हेंबर तारीख नमूद आहे, हे ट्विट त्यांचे फॉलोअर्स त्यांच्या आठवणीत समाज माध्यमातून पोस्ट करून  त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. 





चित्राचे छायाचित्र पोस्ट करत त्यांनी 'वॉर ऍण्ड पीस' असे कॅप्शन दिले. या चित्रातून त्यांना काय सुचवायचे होते,त्यावेळी त्यांच्या मनात काय भावना होत्या,असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे. त्यांनी पोस्ट केलेले अखेरचे चित्र समाज माध्यमात आता व्हायरल होत आहे. 




 

या ट्विटनंतर काही वेळाने जेव्हा त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले, त्यावेळी सर्वांना एकच धक्का बसला. त्यांच्या फॉलोअर्सनी त्यांना याच ट्विट वर  श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. 




दरम्यान,डॉ शीतल या उत्तम चित्रकारही होत्या. त्यांनी स्वतःची आर्ट थेरपी विकसित केली होती.संगीत,चित्रकला आदी कलेच्या माध्यमातून मानसिक व्याधींवर उपचार कसे करायचे,याबाबत त्या  मार्गदर्शन देखील करीत होत्या,असे कळते.


हे सुध्दा वाचा: बाबा आमटे यांच्या नात शीतल आमटेची आत्महत्या







टिप्पण्या