Hathras case:अखेर ठाणेदार पवारांची बदली; मात्र शिवसैनिकांना हवं निलंबन... आंदोलन सुरूच

मात्र, संतप्त असलेल्या शिवसैनिकांना ठाणेदाराची बदली नसून,निलंबन पाहिजे आहे, यामागणीची पूर्तता होईपर्यंत शिवसैनक रस्त्यावरच बसणार आहेत,असा शिवसैनकानी निर्धार केलेला आहे. त्यामुळे या आंदोलनाची दिशा एका रात्रीतून कशी बदलते,याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून आहे.

Finally, Thanedar Pawar was replaced;  But Shiv Sainiks want suspension ... agitation continues



भारतीय अलंकार

अकोला : शिवसेनेचा योगी सरकारच्या निषेधार्थ आंदोलनात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या सोबत झालेल्या शाब्दिक वाद व शिवीगाळ प्रकरणात जुने शहर  ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. मात्र, आमदार बाजोरिया यांनी  निलंबनाची मागणी केली होती.  त्यामुळे जोपर्यंत ठाणेदाराला निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत शिवसैनिक जयहिंद चौकात ठाण मांडून बसणार,असा निर्धार शिवसैनिकानी केला आहे. शिवसेनेचे पोलीस विरोधात आंदोलन सात तास उलटूनही  सुरूच आहे.



काय आहे आदेशात

जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरक्षक प्रकाश पवार यांना प्रशासकिय कारणास्तव तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष येथे पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात संलग्न करण्यात येत आहे. त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे हजर होवून अनुपालन अहवाल सादर करावा,असा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी  तातडी ने  दिला आहे.



मात्र,संतप्त असलेल्या शिवसैनिकांना ठाणेदाराची बदली नसून,निलंबन पाहिजे आहे, यामागणीची पूर्तता होईपर्यंत शिवसैनक रस्त्यावरच बसणार आहेत,असा शिवसैनकानी निर्धार केलेला आहे. त्यामुळे या आंदोलनाची दिशा एका रात्रीतून कशी बदलते,याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून आहे. 



शिवसैनिक आणि पोलीस वादाची पार्श्वभूमी

उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केल्यानंतर शिवसेना आमदार आणि जुने शहर ठाणेदार मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होतो. हे प्रकरण चिघळल्याने आता शिवसेनेच्या तीन आमदारांनी  ठाणेदार प्रकाश पवार यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी सहा तास उलटून गेले तरी जयहिंद चौकात शिवसेनेचा रास्ता रोको सुरूच आहे.जयहिंद चौकात शिवसैनिक 'ठाणेदार हटाव' याकरिता ठाण मांडून बसले आहेत.


आज अकोल्यात शिवसेनेने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. उत्तरप्रदेशातील हाथरसमधील घटना आणि माध्यमांच्या मुस्कटदाबी विरोधात शिवसेनेने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला.



उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर देशभरातून  योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. देशभर आंदोलन पेटले आहे. आज विदर्भातील अकोल्यात शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घटनेचा निषेध नोंदविला. योगी आदित्यनाथ सरकारचा कडाडून विरोध केला.


जुने शहरातील जयहिंद चौकात हे आंदोलन करण्यात आले.  शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांची या आंदोलनात उपस्थिती होती. 



यावेळी शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार यांच्याशी आमदार नितीन देशमुख आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यात जोरदार वाद आणि शिवीगाळ प्रकार घडला.


यानंतर काही शिवसैनिक पोलिसांवर धावून ही गेले.काही वेळ यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. यानंतर हे प्रकरण चिघळले.यामुळे तीन-चार तासापासून जयहिंद चौकात शिवसेनेने रास्ता रोको करीत ठिय्या मांडला. ठाणेदार पवार यांची बदली करण्याची जोरकस मागणी शिव सैनिकांनी लावून धरली आहे.


हे सुद्धा वाचा:'ठाणेदार हटाव'यासाठी शिवसैनिक बसले चौकात ठाण मांडून


हे सुध्दा वाचा: शिवसेनेचे आंदोलन चिघळले...ठाणेदार पवारांच्या निलंबनाची मागणी


हे सुध्दा वाचा:हाथरस घटनेचा निषेध;अकोला शिवसेनेने जाळला योगी आदित्यनाथचा प्रतिकात्मक पुतळा











टिप्पण्या