hidayat-patel-murder-case-akt: काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्या प्रकरणात मोठा निर्णय; संशयित मोहम्मद बद्रूजम्मा व संजय बोडखे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
In the murder case of Congress leader Hidayatullah Patel, a major decision has been made; the Akot Sessions Court rejected the anticipatory bail applications of the suspects Mohammad Badruzzama and Sanjay Bodkhe.
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला | नीलिमा शिंगणे जगड
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्या खून प्रकरणात संशयित आरोपी मोहम्मद बद्रुजम्मा मो. आदील व संजय रामदास बोडखे यांना मोठा धक्का बसला असून, अकोट येथील सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
आज २७ जानेवारी २०२६ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
काय आहे प्रकरण?
दि. ६ जानेवारी २०२६ रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा गावात हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्यावर मस्जिदमध्ये नमाजानंतर वाचन करत असताना चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान ७ जानेवारी २०२६ रोजी अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादीत काय म्हटले आहे?
मृतकांचे पुतणे फतेह अली खान रफतउल्ला खान पटेल यांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
हल्लेखोर उबेद पटेल राजीक उर्फ कालू पटेल याने थेट चाकूने वार केले
हा हल्ला मोहम्मद बदुजम्मा, राजू बोचे, संजय बोडखे यांच्या सांगण्यावरून करण्यात आला.
आरोपींनी कट रचून हल्ल्यास प्रवृत्त केले, असा मृतकाने उपचारादरम्यान खुलासा केला होता.
सरकार पक्षाचा युक्तीवाद
सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. आर. आर. (गिरीश) देशपांडे यांनी न्यायालयात ठोस युक्तीवाद करत सांगितले की,
गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे
संशयित आरोपी घटनेपासून फरार आहेत
आरोपींनी हल्लेखोराला प्रवृत्त केल्याचा संशय आहे
तपास अद्याप सुरू असून अपूर्ण आहे
जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाचा निर्णय
दोन्ही बाजूंचा सखोल युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की,
आरोपींना अटकपूर्व जामीन दिल्यास तपासात अडथळा येऊ शकतो
समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे दोन्ही संशयित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले.
न्यायालयात यांनी मांडली बाजू
सरकारतर्फे:
ॲड. आर. आर. देशपांडे
ॲड. अजित देशमुख
सरकार पक्षाला सहकार्य फिर्यादीतर्फे:
ॲड. मुन्ना खान
ॲड. श्रीरंग तट्टे
आरोपीतर्फे:
ॲड. एस. एस. जोशी
ॲड. बी. के. गांधी
ठळक मुद्दे (News Highlights)
काँग्रेस नेते हिदायतउल्ला पटेल हत्या प्रकरण
दोन संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
आरोपी फरार, तपास अद्याप अपूर्ण
जामीन दिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा धोका – कोर्ट
पोलीस तपास वेगात सुरू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा