- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे अपघातात निधन झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.
आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतताना शिवर येथे हा अपघात झाला. एका पिक अप गाडीने तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तुकाराम बिडकर आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र राजदत्त मानकर या दोघांचाही मृत्यू झाल्याचे कळते.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
टाटा पीक अप वाहनाने बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यांना तातडीने स्थानिक हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान हे वाहन हे गुरांची वाहतूक करीत असल्याने काही पोलीस त्या वाहनाचा पाठलाग करीत असल्याने वाहनचालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वीच त्यांचा अकोल्याला अपघात झाला होता. त्यांच्यावर मुंबई येथे उपाचार सुरू होते. या अपघातातून ते सहिसलामत वाचले होते. मात्र आज त्यांच्यावर काळाने घाला घातला.
भारतीय अलंकार न्युज 24 तर्फे मा. तुकाराम भाऊ बिडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा