Hathras case:'ठाणेदार हटाव' यासाठी शिवसैनिक बसले चौकात ठाण मांडूनच

'ठाणेदार हटाव' यासाठी शिवसैनिक बसले चौकात ठाण मांडून…




सहा तास उलटूनही कारवाई नाही...





*शिवसेनेचे आंदोलन चिघळले...ठाणेदार पवारांच्या निलंबनाची मागणी



भारतीय अलंकार

अकोला: उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केल्यानंतर शिवसेना आमदार आणि जुने शहर ठाणेदार मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होतो. हे प्रकरण चिघळल्याने आता शिवसेनेच्या तीन आमदारांनी  ठाणेदार प्रकाश पवार यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी सहा तास उलटून गेले तरी जयहिंद चौकात शिवसेनेचा रास्ता रोको सुरूच आहे.जयहिंद चौकात शिवसैनिक 'ठाणेदार हटाव' याकरिता ठाण मांडून बसले आहेत.




आज अकोल्यात शिवसेनेने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. उत्तरप्रदेशातील हाथरसमधील घटना आणि माध्यमांच्या मुस्कटदाबी विरोधात शिवसेनेने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला.


उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर देशभरातून  योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. देशभर आंदोलन पेटले आहे. आज विदर्भातील अकोल्यात शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घटनेचा निषेध नोंदविला. योगी आदित्यनाथ सरकारचा कडाडून विरोध केला.




जुने शहरातील जयहिंद चौकात हे आंदोलन करण्यात आले.  शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांची या आंदोलनात उपस्थिती होती. 



यावेळी शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार यांच्याशी आमदार नितीन देशमुख आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यात जोरदार वाद आणि शिवीगाळ प्रकार घडला.


यानंतर काही शिवसैनिक पोलिसांवर धावून ही गेले.काही वेळ यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. यानंतर हे प्रकरण चिघळले.यामुळे तीन-चार तासापासून जयहिंद चौकात शिवसेनेने रास्ता रोको करीत ठिय्या मांडला. ठाणेदार पवार यांची बदली करण्याची जोरकस मागणी शिव सैनिकांनी लावून धरली.











टिप्पण्या