- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गर्दी पांगविण्या दरम्यान शिवसेनेचे आमदार, कार्यकर्ते आणि ठाणेदार यांच्यात शाब्दिक वाद आणि शिवीगाळ झाली.
भारतीय अलंकार
अकोला: उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केल्यानंतर शिवसेना आमदार आणि जुने शहर ठाणेदार मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. हे प्रकरण चिघळल्याने आता शिवसेनेच्या तीन आमदारांनी ठाणेदार प्रकाश पवार यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी तीन तासांपासून जयहिंद चौकात शिवसेनेचा रास्ता रोको सुरू आहे.
आज अकोल्यात शिवसेनेने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. उत्तरप्रदेशातील हाथरसमधील घटना आणि माध्यमांच्या मुस्कटदाबी विरोधात शिवसेनेने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर देशभरातून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. देशभर आंदोलन पेटले आहे. आज विदर्भातील अकोल्यात शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घटनेचा निषेध नोंदविला. आदित्यनाथ सरकारचा कडाडून विरोध केला.
जुने शहरातील जयहिंद चौकात हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांची या आंदोलनात उपस्थिती होती.
यावेळी शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार यांच्याशी आमदार नितीन देशमुख आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यात जोरदार वाद आणि शिवीगाळ प्रकार घडला.
यानंतर काही शिवसैनिक पोलिसांवर धावून ही गेले.काही वेळ यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. यानंतर हे प्रकरण चिघळले.यामुळे तीन-चार तासापासून जयहिंद चौकात शिवसेनेने रास्ता रोको करीत ठिय्या मांडला. ठाणेदार पवार यांची बदली करण्याची जोरकस मागणी शिव सैनिकांनी लावून धरली आहे.
हे सुद्धा वाचा:हाथरस घटनेचा निषेध;अकोला शिवसेनेने जाळला योगी आदित्यनाथचा प्रतिकात्मक पुतळा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा