- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तूर्तास आंदोलन मागे घेतले आहे. परंतू पवार यांची विभागीय चौकशी व्हावी,अशी मागणी केली आहे.पोलीस विभागाने यावर योग्य कारवाई केली नाहीतर, पवार यांनी केलेल्या गैरकृत्याचा पाढा येत्या हिवाळी अधिवेशनात वाचला जाईल,असे आमदार गोपिकीसन बाजोरिया यांनी सांगितले.
The dispute between Shiv Sena and the police
भारतीय अलंकार
अकोला : शिवसेनेचा योगी सरकारच्या निषेधार्थ आंदोलनात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या सोबत झालेल्या शाब्दिक वाद व शिवीगाळ प्रकरणात जुने शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. मात्र, आमदार बाजोरिया यांनी निलंबनाची मागणी केली होती. त्यामुळे जोपर्यंत ठाणेदाराला निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत शिवसैनिक जयहिंद चौकात ठाण मांडून बसणार,असा निर्धार शिवसैनिकानी केला होता. शिवसेनेचे पोलीस विरोधात आंदोलन सात तास उलटूनही सुरूच होते. परंतु त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून आमदार बाजोरिया यांनी उशीरा रात्री आंदोलन तूर्तास मागे घेतले.
अन्यथा हिवाळी अधिवेशनात…
ठाणेदार पवार यांच्या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर तातडीने काढले. मात्र, शिवसैनिकांना हा आदेश मान्य नव्हता. त्यामुळे रात्री पण आंदोलन सुरूच होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या विनंतीला मान देवून शिवसैनिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून, तूर्तास आंदोलन मागे घेतले आहे. परंतू पवार यांची विभागीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. पोलीस विभागाने यावर योग्य कारवाई केली नाहीतर, पवार यांनी केलेल्या गैरकृत्याचा पाढा येत्या हिवाळी अधिवेशनात वाचला जाईल,असे आमदार गोपिकीसन बाजोरिया यांनी सांगितले.
यांच्या नेतृत्वात झाले आंदोलन
आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, आमदार विप्लव बाजोरिया, राजेश मिश्रा,गजानन चौहान, अश्विन नवले, अतुल पवनीकर, संतोष अनासने, योगेश अग्रवाल, सागर भारुका, देवश्री ठाकरे, शुभांगी किंगे, ज्योत्स्ना चौरे, मंजुषा शेळके आदीं पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक हाथरस अत्याचार, यूपी सरकार,पत्रकारांची मुस्कटदाबीचा निषेध व त्यानंतर केलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.
काय आहे आदेशात
जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरक्षक प्रकाश पवार यांना प्रशासकिय कारणास्तव तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष येथे पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात संलग्न करण्यात येत आहे. त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे हजर होवून अनुपालन अहवाल सादर करावा,असा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला आहे.
मात्र,संतप्त असलेल्या शिवसैनिकांना ठाणेदाराची बदली नसून,निलंबन पाहिजे आहे, यामागणीची पूर्तता होईपर्यंत शिवसैनिक रस्त्यावरच बसणार आहेत,असा शिवसैनिकानी निर्धार केलेला होता. त्यामुळे या आंदोलनाची दिशा एका रात्रीतून कशी बदलते,याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून होते. मात्र, उशीरा रात्री पोलिसांच्या विनंतीला मान देवून शिवसैनिकांनी आंदोलन स्थगित केले.
शिवसैनिक आणि पोलीस वादाची पार्श्वभूमी
उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केल्यानंतर शिवसेना जेष्ठ आमदार गोपिकीसन बाजोरिया आणि जुने शहर ठाणेदार पवार यांच्यात बाचाबाची झाली होती. एवढेच नव्हेतर आंदोलनात सहभागी महिला कार्यकर्त्यां सोबत असभ्य वर्तन केले, असे शिवसैनिकांचे म्हणणे होते. त्यामुळे हे प्रकरण चिघळल्याने शिवसेनेच्या तीन आमदारांनी ठाणेदार प्रकाश पवार यांच्या निलंबनाची मागणी केली. मागणीच्या पूर्ततेसाठी सहा तास उलटून गेले तरी जयहिंद चौकात शिवसेनेचा रास्ता रोको सुरूच होता. जयहिंद चौकात शिवसैनिक 'ठाणेदार हटाव' याकरिता ठाण मांडून बसले होते.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर देशभरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. देशभर आंदोलन पेटले आहे. शनिवारी विदर्भातील अकोल्यात शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घटनेचा निषेध नोंदविला. योगी आदित्यनाथ सरकारचा कडाडून विरोध केला.
यावेळी शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार यांच्याशी आमदार नितीन देशमुख आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यात जोरदार वाद आणि शिवीगाळ प्रकार घडला.
यानंतर काही शिवसैनिक पोलिसांवर धावून ही गेले. काही वेळ यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. यानंतर हे प्रकरण चिघळले. यामुळे तीन-चार तास जयहिंद चौकात शिवसेनेने रास्ता रोको करीत ठिय्या मांडला. ठाणेदार पवार यांच्या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी काढले होते.पण शिवसैनिकांना हा आदेश मान्य नव्हता.ठाणेदार पवार यांना निलंबित करण्याची जोरकस मागणी शिव सैनिकांनी लावून धरली होती.उशीरा रात्रीं पर्यंत शिवसैनिकानी ठिय्या आंदोलन केले.
दुसऱ्यांदा आमने-सामने
अकोला शिवसेना आणि ठाणेदार पवार या आंदोलना निम्मित दुसऱ्यांदा आमने सामने आले. यापूर्वी,जुने शहरात आयोजित शिवजयंती (तिथीनुसार) मिरवणूक वरून आमदार नितीन देशमुख आणि ठाणेदार पवार यांच्यात खडाजंगी झाली होती.
अकोलेकरांच्या मनातील प्रश्न
*सध्या कोरोनाच्या परिस्थितीत शिवसैनिक आणि ठाणेदार यांनी आपापल्या मतावर अडून राहणे योग्य होते का? हा वाद ताबोडतोब सामंजस्यने मिटवता आला असता.एरव्ही नागरिकांना गर्दी होण्याच्या कारणावरून झोडपून काढणारे पोलिसांनी शिवसैनिकांना एवढा वेळ मुख्य चौकात एकत्रित बसू तरी कसे दिले?
*क्षुल्लक कारणावरून आमदारांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत का? सत्ते मध्ये असताना सुद्धा शिवसैनिकांनी क्षुल्लक कारणासाठी पूर्व परवानगी शिवाय पाच सहा तास रस्ता अडवून नागरिकांच्या मूलभूत हक्काचे हनन केले नाही का?
*महाराष्ट्रात दिवसागणिक महिला,बालक,युवा वर्गावर अत्याचार होतात,त्यासाठी शिवसेना वा अन्य राजकीय पक्ष एवढ्या पोट तिडकीने आवाज का उठवीत नाही?
*पोलीस निरीक्षकाची चौकशी न करता,त्यांची बाजू न ऐकता केवळ दबावाखाली तातडीने बदलीचे आदेश काढ ण्याचा किंवा निलंबित करण्याचे अधिकार पोलीस अधीक्षकांना आहेत का ?
भारतीय अलंकारचे कौतूक
या आंदोलनाच्या प्रत्येक घडामोडी पारदर्शकता ठेवत सचित्र झटपट वाचकांपर्यंत पोहचविल्यामुळे सामान्य अकोलेकरां सोबतच आंदोलन कर्त्यांनी भारतीय अलंकार न्युज 24 चे कौतूक केले. याआधी सुध्दा व्यापारी संघटनेने पुकारलेल्या जनता कर्फ्यु संदर्भात वाचकांपर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडी विश्वासहर्ता जपत झटपट पोहचविल्यामुळे भारतीय अलंकारचे सर्व स्तरातून कोतूक झाले होते.
आंदोलनातील घडामोडी
हे सुध्दा वाचा:अखेर ठाणेदार पवारांची बदली; मात्र शिवसैनिकांना हवं निलंबन... आंदोलन सुरूच
हे सुध्दा वाचा:'ठाणेदार हटाव'यासाठी शिवसैनिक बसले चौकात ठाण मांडूनच
हे सुद्धा वाचा:शिवसेनेचे आंदोलन चिघळले; ठाणेदार पवार यांच्या निलंबनाची मागणी
हे सुध्दा वाचा: हाथरस घटनेचा निषेध;अकोला शिवसेनेने जाळला योगी आदित्यनाथचा प्रतिकात्मक पुतळा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा