Vanchit aaghadi:रस्त्यांवरच्या खड्यात कमळ लावल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांना अटक Vanchit's arrested for planting lotus in potholes on roads

रस्त्यांवरच्या खड्यात कमळ लावल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांना अटक 

Vanchit's arrested for planting lotus in potholes on roads


अकोला: रस्ता बांधकाम व दुरुस्ती कामात भ्रष्टाचार प्रकरणात भाजप सत्ता विरोधात रस्त्याच्या खड्ड्यात कमळाचे फुले लावण्याचे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन वंचित बहूजन  आघाडीच्या वतीने करण्यात केले होते.या प्रकरणात आज वंचितच्या पदाधिकारी यांना  सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली.

यांना झाली अटक

आंदोलन प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते. वंचितचे पदाधिकारी राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, गजानन गवई, दीपक गवई, सचिन शिराळे, विकास सदांशीव आणि आशिष मांगुलकर यांना आज अटक करून जामीन देण्यात आला.



काय आहे प्रकरण

अकोला शहरातील रस्त्याची चाळण झालेली आहे. सत्ताधारी तीन वर्षे रस्त्याची कामे सुरु असल्याचा दिखावा करीत रस्त्याची निकृष्ट कामे केली जात असल्याने वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी ऑगस्ट मध्ये रस्त्यावर उतरले होते.जनहितासाठी झालेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यात वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले.


लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात झालेल्या इतर सर्व राजकीय पक्षांच्या राजकीय आंदोलनाची माहिती पोलिसांना आहे.परंतु पोलीसानी इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनात सहभागी आंदोलका  विरुद्ध गुन्हे दाखल केले नाही.केवळ आमच्या आंदोलकांना लक्ष करून पोलीस कार्यवाही केली आहे.आम्हाला लागणारा न्याय इतर पक्षाच्या आंदोलकांना लाऊन त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली होती. 



राजकीय दबावाखाली केवळ वंचितला लक्ष करीत असतील तर हे सहन केले जाणार नसून  पोलीस विभागाच्या दडपशाही  विरुद्ध रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही पक्षाने दिला होता. अकोला शहरात सर्वच भागात एकाच वेळी वंचितने आंदोलन केले होते.



टिप्पण्या