VBA: रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात आंदोलन ; वंचितच्या पदाधिका-यावर गुन्हे दाखल

रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात आंदोलन केल्याने वंचितच्या पदाधिका-यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल, हाच न्याय इतर पक्षाच्या आंदोलनास लावा !  

The agitation against the bad condition of the road has led to the filing of cases against the deprived office bearers in various police stations, bring the same justice to the agitation of other parties!


अकोला दि. १८ : शहरातील रस्त्याची चाळण झालेली आहे.गेली तीन वर्षे रस्त्याची कामे सुरु असल्याचा दिखावा करीत रस्त्याची निकृष्ट कामे केली जात असल्याने वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी रविवारी रस्त्यावर उतरले होते.जनहितासाठी झालेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यात काल वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत.लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात झालेल्या इतर सर्व राजकीय पक्षांच्या राजकीय आंदोलनाची माहिती पोलिसांना आहे.परंतु पोलीसानी इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनात सहभागी आंदोलका  विरुद्ध गुन्हे दाखल केले नाही.केवळ आमच्या आंदोलकांना लक्ष करून पोलीस कार्यवाही केली आहे.आम्हाला लागणारा न्याय इतर पक्षाच्या आंदोलकांना लाऊन त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.राजकीय दबावाखाली केवळ वंचितला लक्ष करीत असतील तर हे सहन केले जाणार नसून  पोलीस विभागाच्या दडपशाही  विरुद्ध रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही पक्षाने दिला आहे.

शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत.अगदी कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण केल्या जाणा-या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.ह्या रस्त्यानी आणि रस्तेकाम सुरू असताना काही जीव देखील गेले आहेत.ह्या विरोधात रविवारी वंचीत बहुजन आघाडीने शहरातील ११ ठिकाणी सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलन केले.त्यावर सिटी कोतवाली, रामदास पेठ, सिव्हिल लाईन्स आणि अकोटफैल पोलीस स्टेशन मध्ये पक्षाच्या विविध पदाधिका-या विरोधात कलम १८८, १४३,२६९ सह १३५ आणि कोविड 19 साथ रोग नियंत्रण कायदा इतर कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत.जनहिताच्या मुद्द्यावर तुरुंगात जाण्याची पदाधिका-यांची तयारी आहे.

तथापि लॉकडाऊन मध्ये आंदोलन करणे हा गुन्हा असेल तर ह्यापूर्वी जिल्ह्यात विनापरवानगी झालेल्या सर्व राजकीय आंदोलना मध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्ष आणि नेते तसेच जनप्रतिनिधी विरोधात गुन्हे दाखल केले गेले पाहिजे.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने ईमेल व्दारे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य सरकार कडे केली आहे.  

ह्यापूर्वी राष्ट्र्वादीने बोगस बियाणा विरोधात कृषी अधिकारी कार्यालयात पेरणी केली आहे.काँग्रेसने हाच मुद्दा घेऊन महाबीज मध्ये ठिय्या आंदोलन दिले आहेआणि वीज बिल विरोधात वीज मंडळ कार्यालया समोर आंदोलन केले आहे.सेनेच्या वतीने दोनवेळा जिल्हाभर रस्ता रोको आणि जुतेमारो आंदोलने झाली आहेत.भाजपाने देखील दोनवेळा जिल्हाभर दूध दरवाढ व इतर मुद्द्यावर जवळजवळ ४२ ठिकाणी आंदोलन केली आहेत.कालही भाजपच्या उपमहापौर आणि काही पदाधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे.ह्या राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनाला पोलीस परवानगी नव्हती.मात्र एकाही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही.केवळ वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना लक्ष करून गुन्हे दाखल केले जात असतील तर पोलीस सत्ताधारी राजकीय पक्षाच्या हातचे बाहुले म्हणून काम करीत असल्याचे सिद्ध होईल.म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक ह्यांनी इतर राजकीय पक्षाची लॉकडाऊन मधील झालेली आंदोलनाची माहिती बोलवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत.अशी मागणीही राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.अन्यथा केवळ वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल केले जाणार असतील तर पोलीस विभागाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


भाजपचे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी.

रस्त्याची अर्धवट बांधकामे आणि दुरुस्ती विरोधात काल भाजपच्या उपमहापौर आणि काही पदाधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या दिला.वंचितांच्या आंदोलनानंतर रस्त्याची चाळण झाल्याचा आणि गेली तीन वर्षे रस्त्याची बांधकामे अर्धवट असल्याचा साक्षात्कार भाजपला झाला आहे.भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री, स्थानिक आमदार आणि महापौर आहेत.जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आणि इतर आढावा बैठकीत आजवर त्यांनी कधीही रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात बोलल्याचे दिसले नाही.अधिका-यांना थेट दोषी धरता येण्याची संधी असताना भाजपचे खासदार आमदार महापौर आवाज उठवीत नाहीत.त्यामुळे कालचे ठिय्या आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट आहे.मनपाने केलेलया सिमेंट रस्त्याचे बांधकामाचा दर्जा ५० टक्के असल्याचा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे ह्यांनी केलेल्या सोशल ऑडीट मधून आला आहे.त्यानंतर देखील व्हीएनआयटी ने कोअर कटींग मशीनच्या सहायाने घेतलेल्या वीस नमुन्याचा अहवाल काय आला ? त्यावर मनपाने काय कार्यवाही केली ? त्याविरोधात भाजपवाले कधी ठिय्या देणार आहेत ? असा सवालही वंचितने विचारला आहे.


एकाच वेळी 11 ठिकाणी आंदोलन

*अकोला महानगरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डे आणि भाजपचे भ्रष्टाचार विरोधात वंचित आक्रमक.

*रस्त्यावर साचलेल्या चिखलात कमळ लावून नोंदविला होता निषेध.

*एकाच वेळी अकरा ठिकाणी आंदोलन, "रस्त्याचे पैसे कुणी कुणी खाल्ले ? भाजपने खाल्ले" अश्या घोषणानी शहरात उडवून दिली होती खळबळ.
 
अकोला महानगरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी पदाधिकारी आणि जनप्रतिनिधी ह्यांचे संगनमताने राजरोस भ्रष्ट्राचार सूरु आहे.रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास ह्याचे विरोधात 16 ऑगस्टला वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा - महानगर, महिला आघाडी, सम्यक विध्यार्थी आंदोलन आणि युवक आघाडी रविवारी लॉक डाऊन असताना रस्त्यावर उतरली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कमळाची फुले सोडून भाजपचा निषेध नोंदविला गेला.रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी ह्या मागणी करीता तब्बल अकरा ठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यावर वंचित ने आंदोलन केले होते.

निशांत टॉवर समोरील अंडरपास येथील साचलेल्या पाण्यात प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, दिपक गवई, सुरेंद्र तेलगोटे, सम्राट सुरवाडे, रामाभाऊ तायडे, गजानन गवई, सचिन शिराळे, विकास सदांशीव,सै. जानी, सचिन शिरसाट, संदिप शिरसाट, नितीन सपकाळ,निकि डोंगरे, शुभम पातोडे ह्यांनी आंदोलन केले होते.

वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्वच्या वतीने जठारपेठ चौक ते उमरी आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे , जीवन भाऊ डीगे, निखिल बोरीकर, मनोहर बनसोड ,गुरुदेव पलासपागर, शरद इंगोले, डॉ मेश्राम, शुभम डहाके, वैभव देशमुख, सचिन शिरसाट अँड आकाश भगत (प्रसिद्धी प्रमुख अकोला पूर्व) इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते


सम्यक विद्यार्थी आंदोलनचे वतीने टॉवर चौक आणि अशोक वाटिका येथे आंदोलन करण्यात आले.ह्यावेळी अकोला जिल्हा महासचिव प्रतुल विरघट, धिरज इंगळे, संघटक आकाश गवई, प्रसिद्धी प्रमुख पवन गवई, प्रवक्ता विशाल नंदागवळी, उपाध्यक्ष आदित्य बावनगडे, सुमित भांबोरे, अड.भुषण घनबहादुर, राहुल इंगळे यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


युवक आघाडीचे वतीने पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात आले.ह्यावेळी (शहर अध्यक्ष पश्चिम )आशिष मांगुळकर  रवि उमाळे ,सागर तायड़े, संदीप सिरसाट, नितिन सपकाळ, वसीम शेख ,जुबेर खान , रवि वाघ,गोलू जावळ  वैभव खडसे उपस्थित होते.


अकोला मानिक टॉकीज चौक मोठ्या गणपतिजवळ वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पश्चिम अध्यक्ष कलीम खान पठान, महेंद्र डोंगरे, युवा नेता अनवर शेरा, महासचिव मिलिंद वाकोड़े, अमोल वाकोड़े प्रवक्ता, महासचिव अजय तायडे, उपाध्यक्ष रजा़ ईरानी, सचिव इरफान शेख, हैदर शाह, शहादत अली, सैयद शकील , यूनुस शाह, कासम शेख, जावेद पठान, सोहेल भाई, रिज़वान भाई, आरिफ अहमद अजहर पठान, उमर भाई, नाजि़म लीडर, जुनेद मंजर साहब, राजा पठान, आरिफ मामू, एडवोकेट अजहर अजी़जी, साबिर मौलाना, फैयाज ठेकेदार, समीर पठान, अशफाक भाई, एजाज़ खान, फिरोज़ शाह, इमरान भाई, वसीम पठान, शेख नईम हाजी साहब, शेख महबूब, शोएब कुरैशी, आज़म शेख ह्या पदाधिकारी कार्यकर्ता ह्यांनी आंदोलन केले होते.


माधुरी कॉल्डड्रिंक समोर युवक आघाडीच्या वतीने जय रामा तायडे महानगर अध्यक्ष युवक,अमित मोरे महासचिव युवक, किरण सिरसाट,अश्विन  शिरसाट (सोनू),मंगेश इंगळे, प्रशांत वरघट, सुमित तेलगोटे,शुभम खंडारे, अक्षय शेंगोकर, स्वप्नील बागडे, साहिल आठवले, धम्मा तायडे, शुभम हिवराळे, गौरव पातूरडे,अक्षय गाते, पावन सावळे, आशिष पारिषे उपस्थित होते.


वाशिम बायपास,अकोला येथील आंदोलना मध्ये जि प अध्यक्षा प्रतिभा भोजने, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभा शिरसाट, महासचिव शोभा शेळके, सभापती म बा मनिषा बोर्डे, जि प सदस्या निता गवई, प्रतिभा अवचार, योगीता वानखडे, पं स गटनेता मंगला शिरसाट, उमा अंभोरे, सुरेखा सावदेकर , सुनिता धुरंधर, गीता गवई,  मंदा वाकोडे, शिला गोपनारायण,मंदा आठवले, माया तायडे, सरला बाभुळकर, सुलोचना सोनोने, प्रभा गवई, लता टोबरे, शिला मोहोळ,वंदना घुगे, बेबी दांडगे, गंगाबाई शिरसाट, मीरा ईंगळे, अर्चना कांबळे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.


जुने शहर डाबकी रोड कानाल रोड येथे वंचीत बहुजन आघाडीच्या पश्चिम महासचिव प्रा. मंतोष मोहोळ, मिलिंद  तेलगोटे, सोमेश डिगे ,धीरज  खंडारे, हिम्मत जाधव रेखा गवई, पुष्पा  वानखेडे, राजकन्या वानखेडे , वर्षा हिवराळे, प्रतिभा वानखेडे सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता .


सम्यकने केले टाॅवर चौकातील रस्त्याच्या मधोमध खड्ड्यात कमळ लावुन आंदोलन होते. सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा महासचिव प्रतुल विरघट,धिरज इंगळे, संघटक आकाश गवई, प्रसिद्धी प्रमुख पवन गवई, प्रवक्ता विशाल नंदागवळी, उपाध्यक्ष आदित्य बावनगडे, सुमित भांबोरे,अड.भुषण घनबहादुर,राहुल इंगळे यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोट फैल येथे आंदोलन करताना वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव अरून्धती शिरसाट, महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, बुध्दरत्न इंगोले, धनश्री देव, किरण बोराखडे, सुवर्णा जाधव, प्रिती भगत, मंतोष मोहोड, विश्वास बोराडे, श्रावण ठोसर, श्रीकांत गायकवाड, किशोर मानवटकर सहभागी झाले होते.


वंचितच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्डे व त्यात साचलेल्या पाण्यात सत्ताधारी भाजप विरोधात केलेल्या आंदोलन ह्यामुळे लॉकडाउन असतांना केलेल्या आंदोलना मूळे आंदोलन होताच तासाभरात माणेक टॉकीज टिळक रोड येथे खड्यात मुरूम टाकण्यास सुरुवात करण्यात आली होती.


टिप्पण्या