Public curfew:व्यापारी संघटनेने दोन दिवसातच जनता कर्फ्यु गुंडाळला… सराफा बाजार उद्यापासून पूर्ववत सुरू होणारThe trade association has lifted the public curfew in two days. The bullion market will resume from tomorrow

व्यापारी संघटनेने दोन दिवसातच जनता कर्फ्यु गुंडाळला… सराफा बाजार उद्यापासून पूर्ववत सुरू होणार

The trade association has lifted the public curfew in two days. The bullion market will resume from tomorrow





व्यापारी संघटनेने पुकारलेल्या जनता कर्फ्युला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद




अकोला: अकोला जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेनी २५ ते २९ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्युची हाक दिली होती. परंतु बेकायदेशीर घोषित केलेल्या या जनता संचारबंदीला सामान्य अकोलेकर, ग्राहक,विक्रेते,फेरीवाले आणि छोटे व्यापारी यांनी प्रतिसाद दिला नसल्याने दुसऱ्या दिवशीच संचारबंदी रद्द करण्यात आली.


संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी रात्री विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकारी यांची बैठक झाली. तर आज शनिवारी सकाळी सराफा असोसिएशनची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत जनता संचारबंदी बाबतच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.सराफा असोसिएशनने या संचारबंदीतुन माघार घेतली. त्यामुळे उद्या रविवार २७ सप्टेंबर पासून अकोला सराफा बाजार पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.



जनता कर्फ्युला नागरिकांनी सुरवाती पासूनच विरोध दर्शविला होता. व्यापारी संघटनेने पुकारलेल्या  या जनता कर्फ्युला पूर्ण समर्थन आहे,असे सुरवातीला म्हणणाऱ्या जिल्हा, पोलीस, मनपा प्रशासनाने शहरातील सामाजिक व राजकीय संघटनांचा रोष पाहून, नंतर केवळ नैतिक समर्थन असल्याचे दर्शविले. यामुळे या संचारबंदीला सामान्य नागरिक आणि व्यावसायिकानी अजिबात प्रतिसाद दिला नसल्याचे शुक्रवारी संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी दिसून आले. नागरिकांमध्ये जनता संचारबंदी संबंधी संभ्रम निर्माण झाला होता. कारण काही व्यापारी संघटनांनी याला समर्थन दिले तर काहींनी याला विरोध केला होता . 


अकोल्यात कोरोना बधितांचा आकडा ७  हजार जवळ पोहचला आहे. मृतांचा आकडा २२० च्या जवळपास आहे.जनता कर्फ्युमध्ये जनतेनी सहभागी व्हावे, यासाठी अकोला जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा आवाहन केले आहे होते. मात्र, असविंधानिक रित्या घोषित केलेल्या  या संचारबंदीला वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, श्रीराम सेना, किसान ब्रिगेड, भाजी विक्रेता संघटना,नाभिक दुकानदार यांनी जोरदार विरोध केला. नंतर भाजपाने सुध्दा विरोध दर्शविला. तसेच काही व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता हा निर्णय चेंबरने घेतला असा आरोप सुध्दा काही व्यापारी संघटनेच्या पदाधिकारीनी केला. 


रेशन दुकानदारांचा नैतिक पाठींबा


विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित अकोला जनता कर्फ्यू  मध्ये राशन दुकान बंद ठेवावे की सुरु ठेवावे हा सम्भ्रम होता. जनता कर्फ्यूला अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे नैतिक पाठिंबा देण्यात आला.परंतु रास्त भाव धान्य दुकान ही अर्थात जीवनावश्यक वस्तू सेवा कायद्यांतर्गत असल्यामुळे आणि सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने  परिस्थिती बिघडली असल्यामुळे  धान्याचे दुकान  सुरूच राहतील, अशी भूमिका राशन दुकानदार संघटनांनी घेतली होती.  


विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जनता कर्फ्यु यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, या बंदला पहिल्या दिवशीच अल्प प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या संचारबंदी  संदर्भात नंतर जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली. नागरिकांनी व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी केले होते , हे येथे विशेष.



या निर्णयांमध्ये चेंबरच्या ८२ संघटनानी सहभाग दर्शविला होता. प्रत्यक्षात मात्र, फक्त काही संघटनांनीच पूर्णपणे समर्थन दिले. किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने  सुरू ठेवली होती. नागरिक खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. पहिल्याच दिवशी अल्प प्रदिसाद मिळाल्याने  व्यापार्‍यांचा बंद पाच दिवस यशस्वी होईल का, अशी शंका नागरिक व्यक्त करीत होते. अखेर आज बंद मध्ये सामील असलेली मुख्य सराफा संघटनाच बाहेर पडल्याने जनता कर्फ्यु  गुंडाळल्या गेला.


हे वाचा:विदर्भ चेंबरने जनतेची दिशाभूल केल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करणार-श्रीराम सेना










टिप्पण्या