Public curfew: विदर्भ चेंबरने जनतेची दिशाभूल केल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करणार-श्रीराम सेना। Vidarbha Chamber to lodge complaint with police for misleading people: Shriram Sena

विदर्भ चेंबरने जनतेची दिशाभूल केल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करणार-श्रीराम सेना

Vidarbha Chamber to lodge complaint with police for misleading people: Shriram Sena



पोलीस स्टेशन मध्ये विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे


व्यापाऱ्यांची हुकूमशाही जनतेने मोडून काढली 


अकोला:  विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने गैर कायदेशीर रित्या पाच दिवसीय जनता  कर्फ्यु घोषित केला होता.याला शासकीय अधिकारी वर्गाने देखील पूर्ण समर्थन दिले होते. मात्र,अश्या रीतीने जनता कर्फ्यु घोषित करणे ,कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन असून, यामुळे सामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे, यासाठी दोषींबर कायदेशीर मार्गाने पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड.पप्पू मोरवाल यांनी सांगितले. शनिवारी श्रीराम सेनेने आयोजित पत्रकार परिषदेत मोरवाल यांनी ही मगिती दिली.  



१२ एप्रिल  रोजी सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावणारा लॉकडाऊन  शासनाने लागू केला होता त्यामध्ये श्रीमंतांनी लॉक डाऊन काळात चांगले चांगले खाऊन दिवस काढले असले तरीही  सर्वसामान्य जनता, हातावर पोट भरण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्वसामान्य मजुरांचे हाल झाले आहेत. श्रीमंतांनी  दान करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. मात्र , त्यावर कुटुंब जगणे मुश्किल झाले आहे अश्या परिस्थितीतून सर्वसामान्य जनता सावरत नाही तोच पुन्हा व्यापाऱ्यांनी ५ दिवसांचा जनता कर्फ्युची घोषणा केली. 


मात्र, त्यात सर्वसामान्य जनतेचा  विचार केला नाही  त्यामुळेच  अकोल्यामधील मजूर, छोटे व्यापारी यांनी हा व्यापाऱ्यांचा  कर्फ्यु नाकारला आहे.  याचे श्रेय सर्व प्रसारमाध्यमे आणि सामान्य माणसाला असल्याचे प्रतिपादन  श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष  ऍड पप्पू मोरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.

 
अकोल्यात विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स या संघटनेने काल २५ संप्टेंबर पासून ५ दिवस जनता कर्फ्युची घोषणा केली. त्याला शासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनीही गैरकायदेशीरपणे  समर्थन देत जनतेला कर्फ्युत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. हा शासकीय कर्फ्यु नसतांनाही शासकीय अधिकारी यांनी समर्थन देणे हे गैरकायदेशीर असून अधिकारी यांनी लोकांना संभ्रमित करणे गुन्हा आहे. आणि अकोल्यात अधिकाऱ्यांनी तो गुन्हा केला आहे . तरीही अकोल्यातील सर्वसामान्य जनतेने हा लादण्यात आलेला कर्फ्यु नाकारल्याने  त्यासर्व मजूर, छोटे व्यापारी  आणि जनतेचे  श्रीराम सेना मनापासून आभार व्यक्त करीत असल्याचे ऍड पप्पू मोरवाल यांनी सांगितले. यावेळी अब्दुल राझिक, रावसाहेब, आशिष सारडा उपस्थित होते.

टिप्पण्या