Namami ganga scheme:गणेश पोटे यांच्या नदी पोहणे आंदोलनात भाजपाची उडी;नमामि गंगे योजनेची झाली आठवण। BJP's jump in Ganesh Pote's river swimming agitation; Namami Ganga scheme was remembered

गणेश पोटे यांच्या नदी पोहणे आंदोलनात भाजपाची उडी;नमामि गंगे योजनेची झाली आठवण

BJP's jump in Ganesh Pote's river swimming agitation; Namami Ganga scheme was remembered


 *आ.सावरकरांनी घेतली आंदोलनाची दखल


*जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद


भारतीय अलंकार

अकोला: दूषित पूर्णा नदीचे  संपुर्ण शुद्धीकरण व्हावे,या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी पूर्णा नदीत पोहत,नदीपात्रात आंदोलन सुरू केले आहे.दोन दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात आज भाजपाने उडी घेतली आहे. भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी आंदोलनाची दखल घेतली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी यासंदर्भात भेट घेतली. पापळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.



केंद्र सरकार नदी प्रदूषण दूर करण्यासाठी नमामि गंगे सारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून कार्य करीत असतांना, विदर्भातील खारपाण पट्टातून वाहणारी पूर्णा नदी रासायनिक घटकांमुळे प्रदूषित होवून नदी काठावरील नागरिक तसेच जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात वारंवार प्रदूषण बोर्ड व प्रशासनाकडे सन २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा करीत असतांना सुद्धा  प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे यांना कोविड - १९ च्या काळात आंदोलन करण्याची वेळ आली. ही दुर्दैवी बाब असून, याबाबत जिल्हा प्रशासन व प्रदूषण मंडळ दुर्लक्ष करीत आहे. याचा उद्रेक झाल्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन दिला.


आ. रणधीर सावरकर जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने सन २०१४ पासून विधिमंडळ  सभागृहात व विविध मंत्री व संबंधित खात्यातील राज्य शासन व प्रदूषण बोर्डाकडे व जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग यांचेकडे पूर्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न मांडले. 


याभागातील खारपाण पट्टा असल्यामुळे पाणी टंचाई लक्षात घेता व पशुधनाला पाणी पिण्यासाठी पूर्णा नदी ही एकमेव साधन असल्यामुळे नदीचे प्रदूषण दूर करण्याची गरज असून, अनेक गुरे ढोरे यामुळे दगावली आहेत. 


याबाबत या भागातील सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे यांनी जनतेच्या समस्या घेवून कोविड- १९ मध्ये आपला जीव धोक्यात घालून 'नदी तैरो' हे आंदोलन सुरु केले आहे. 


याआधी त्यांनी प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. परंतू कुंभकर्णी प्रशासन व प्रदूषण बोर्डाने याची दाखल घेतली नाही. त्यामुळे गांधीग्राम येथे नदीकाठावर आंदोलन सुरु झाले आहे. शासनाने याबाबत दखल घ्यावी, यासाठी जिल्हा भाजपा अध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी तसेच प्रदूषण बोर्ड, जिल्हा आरोग्य अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व अमरावती जिल्ह्यतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, तत्काळ दखल घेण्याची मागणी केली. 


जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सकारात्मक भूमिका घेवून याबाबत सर्व अधिकाऱ्यांना निर्देश देवून तत्काळ समस्या निराकरणाच्या दृष्टीने पाऊले उचलण्याचे आदेश दिले.  याबाबत अधिकाऱ्यांना आंदोलनकर्ते गणेश पोटे यांच्या सोबत चर्चा  करण्यासाठी आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. यावेळी आ. सावरकर यांचे समवेत तेजराव थोरात, माधव मानकर, अंबादास उमाळे, अभिमन्यू नळकांडे, विवेक भरणे आदी उपस्थित होते.


हे सुद्धा वाचा:पूर्णाच्या स्वच्छतेसाठी गणेश पोटे यांचे नदीत पोहत आंदोलन



हे सुद्धा वाचा:पूर्णा नदी शुद्धीकरणासाठी गणेश पोटे बसणार दूषित नदीजल पात्रात!



टिप्पण्या