purification of river: पूर्णा नदी शुद्धीकरणासाठी गणेश पोटे बसणार दूषित नदीजल पात्रात!

पूर्णा नदी शुद्धीकरणासाठी गणेश पोटे बसणार दूषित नदीजल पात्रात!

*१६ सप्टेंबरला गांधीग्राम येथे आंदोलनाला सुरवात.


*कारवाईचे आदेश देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार


भारतीय अलंकार

अकोला: जिल्ह्यातुन वाहत असलेल्या पुर्णा नदीचे पाणी दुषित होण्यापासून वाचवावे, अमरावती एम.आय.डी.सी.चे पाणी पुर्णा नदीत सोडण्यापुर्वी त्यावर प्रक्रीया करावी, याकरीता शासनाने प्रदुषण नियंत्रण मंडळास कारवाईचे आदेश देवून लोकांच्या जीवनाशी सुरू असलेला जीवघेणा खेळ थांबवावा, या मागणीसाठी समाज सेवक गणेश पोटे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्यात बसून आंदोलन करणार आहेत.


गणेश पोटे हे आपल्या अनोख्या पध्दतीने आंदोलन करून जनहिताचे प्रश्न मार्गी लावतात. यापूर्वी सुंदराबाई  खंडेलवाल टॉवर वर चढून केलेले आंदोलन असो की अकोला शहराच्या मध्य भागातून वाहणारी मोर्णा नदीच्या पुलाखाली झुला बांधून त्यावर बसून केलेले आंदोलन असू दे, की खड्डयात बसून केलेले आंदोलन अकोलेकरांच्या आज देखील स्मरणात आहेत. पूर्णा नदी शुद्धीकरणा साठी तातडीने कार्यवाही करावी. कारवाई जो पर्यंत होणार नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे गणेश पोटे यांनी सांगितले.



अकोला जिल्हयातून वाहत आलेल्या पुर्णानदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असून पिण्यायोग्य नाही. नदीकाठी असलेल्या गावांना पुर्णानदी हा जलस्त्रोत असल्याने मानवी तसेच पशुधनांसाठी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण हा भाग  खारपाण पट्यात असल्याने भुगर्भातील पाणी पिण्या योग्य नाही, अशी संवेदनशील परिस्थीतीत असतांना लोकांना दुषीत पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. हा मानव व पशुधनाच्या जिवीताशी खेळ आहे. या दुषीत पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुध्दा प्रयत्न  केले आहेत. परंतु शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाईलाजस्तव गणेश पोटे यांनी आंदोलनाच्या मार्ग स्विकारला. 



"आंदोलनाच्या परिणामी काही जनक्षोभ उसळल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी शासनाची असेल," 

                                   -गणेश पोटे



पुर्णा नदीचे पाणी गेल्या अनेक वर्षा पासून दुषित होत असले तरी, अलिकडच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. अकोला, नागपुर स्थीत नीरी संस्था, अकोला जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, उप प्रादेशिक प्रदुषण मंडळ कार्यालय, अकोला, ग्रामिण पाणी पुरवठा जि.प. अकोला या विभागांना सुध्दा हा विषय हाताळला असला तरी प्रत्यक्षात कार्यवाही मात्र काहीही नाही.


फेब्रुवारी २०१४ रोजी पुर्णा नदीचे पाणी दुषित असल्याचे आढळले, जलजन्य रोगग्रस्तांवर जुजबी उपचार सुध्दा केल्या गेले. दुषित पाण्याचे नमुने तपासणीत रासायनिक घटक असल्याचे समोर आले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी औद्योगीक वसाहतीचे पाणी पुर्णानदीचे पात्रात मिसळल्याने पाणी प्रदुषित झाल्याचा निर्वाळा दिला आहे.


अमरावतीच्या अंबानालाचे पाणी करते नदीला दूषित

पुर्णानदीचे गोपाळखेड, गांधीग्राम, केळीवेळी, दोनवाडा इत्यादि गावांजवळ पाणी नमुने घेऊन रासायनिक दृष्ट्या पाणी दुषित होत असल्याचे नमुद केले आहे. अमरावती जिल्ह्यातील अंबा नाल्याचे पाणी पेढी नदी मार्गाने पुर्णा नदीचे पाण्यात मिसळते. त्यामुळे पाणी रासायनिक दृष्ट्या दुषित होते. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, असे नागपुर स्थीत निरी संस्थेने कळविले असल्याचे समजते. परंतु शासनाने मात्र काहीही कारवाई न केल्याने मानवी व पशुधनाचे जिवीतासाठी जिवघेणा अमानवी प्रकार सुरू आहे.




टिप्पण्या