Covid-19:रोटरीच्या मदतीने पेप्सीको इंडियाने अकोला जीएमसीला दिले दोन हजार कोविड टेस्ट किट

रोटरीच्या मदतीने पेप्सीको इंडियाने अकोला जीएमसीला दिले दोन हजार कोविड टेस्ट किट

किटची किंमत अंदाजे २४ लाख

अकोला: रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० च्यावतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २००० कोविड१९ चाचणी किट प्रदान करण्यात आली.ही देणगी पेप्सीको इंडियाने दिली असून, २००० किट्सची किंमत अंदाजे २४ लाख असल्याची माहिती  RID 3030 असिस्टंट गव्हर्नर इस्माईल नाजमी यांनी दिली.

दोन हजार कोविड 19 चाचणी किट (2000 आरटी-पीसीआर कोविड चाचणी आणि 2000 आरएनए एक्सट्रॅक्शन किट) अकोला  जीएमसीचे डीन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. 
जीएमसीचे डॉ. नितीन अंभोरे, डॉ रुपाली मंत्री आणि डॉ. सिरसाम यांनी किट स्वीकारली. ही देणगी पेप्सिको इंडियाने दिली आहे. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 30 30 च्या वतीने अकोला जीएमसी मध्ये देण्यात आली .

आमच्या चाचणी प्रयोगशाळांच्या संसाधनांना बळकट करण्यासाठी  अकोला रोटरी क्लब आणि  पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष अहमद शेख,  डॉ. अनुप करवा जिल्हा अनुदान अध्यक्ष ३१३२,  जिल्हापाल राजेंद्र भांबरे,  इस्माईल नजमी यांचे यांचे अकोलेकरांच्या वतीने आभार मानतो,अश्या भावना यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केल्या.
.................................
    

टिप्पण्या