vaibhav-lahane-martyred-akl-: अकोल्याचा शूर जवान देशासाठी शहीद; कुपवाडा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावताना नायक वैभव लहाने यांना वीरमरण




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला| नीलिमा शिंगणे जगड 

देशसेवेचा सर्वोच्च आदर्श जपत जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील जवान नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. १२ मराठा लाइट इन्फंट्री या प्रतिष्ठित युनिटमध्ये ते कार्यरत होते. कुपवाडा सेक्टरमध्ये सेवा बजावत असताना दि. ७ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.


शहिद जवानाची थोडक्यात माहिती


शहीद जवानाचे नाव : नायक वैभव श्रीकृष्ण लहाने

युनिट : १२ मराठा लाइट इन्फंट्री

कार्यस्थळ : कुपवाडा सेक्टर, जम्मू-काश्मीर

वीरमरणाची तारीख : ७ जानेवारी २०२६

मूळ गाव : कपिलेश्वर (पो. वडद, ता. अकोला)

पार्थिव आगमन : ९ जानेवारी २०२६, दुपारी १ वाजेपर्यंत

अंतिम संस्कार : कपिलेश्वर येथे शासकीय मानवंदनेसह


जिल्ह्यात शोककळा

नायक वैभव लहाने यांच्या शहादतीची बातमी समजताच अकोला जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानास सर्वत्र भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.



टिप्पण्या