shrimad-devi-bhagwat-katha-: केशवनगर परिसरात श्रीमद देवी भागवत तथा पंचकुंडात्मक शतचंडी याग उत्सवाचे आयोजन
भागवताचार्य अंबरीश महाराज जोशी, सोनईकर यांच्या ओजस्वी वाणीतून साकारणार सप्ताह
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: श्री हरिहर सद्गुरु शक्तीपीठ, संभाजीनगर संचालित श्री जगदंब परिवार अकोलाच्या वतीने स्थानीय केशवनगर परिसरात श्रीमद् देवी भागवत सप्ताह व पंचकुंडात्मक शतचंडी याग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कथा निरूपणकार म्हणून भागवताचार्य पू अंबरीश महाराज जोशी सोनईकर हे लाभणार आहेत. या उत्सवात पंचकुंडात्मक शतचंडी याग ही होणार असून पंचक्रोशीतील महिला पुरुष भक्तांसाठी ही मोठी पर्वणी श्री जगदंब परिवाराच्या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याची माहिती जगदंब परिवार अकोलाच्या वतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मंगळवार दिनांक 27 जानेवारी ते सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी पर्यंत केशवनगर परिसरातील श्री मारुती मंदिर प्रांगणात ही कथा होणार आहे. श्री हरिहर सद्गुरू शक्तीपीठ संभाजीनगरच्या पू. गिरजामाता आईसाहेब यांच्या आशीर्वादाने व प पु सद्गुरु पिठाधिश्वर श्री अप्पा महाराज यांच्या पावन स्मृतीत हे आयोजन होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सोमवार दिनांक 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत नित्य सायं 5-30 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही कथा होणार आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता श्रीमद देवी भागवत ग्रंथाची शोभायात्रा परिसरात आयोजित करण्यात आली आहे.
कथास्थळी दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भजन,पूजन व हवन होऊन सायं 5 वाजता श्रीसूक्त, योगपिठासन स्त्रोत व कुंजिकास्त्रोत पठण होणार आहे. नित्य सकाळी 6 वाजता काकडा, सकाळी 7 वाजता सद्गुरु पादुका पूजन,स. 8 ते स. 11 वाजेपर्यंत दुर्गा सप्तशती पाठ होणार आहे.
गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी पूज्य श्री अनिरुद्ध महाराज, संभाजीनगर यांची पावन उपस्थिती उत्सवात लाभणार आहे.
सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी स 10 वाजता देवी भागवत कथा व शतचंडी यागाची पूर्णाहुती व दु 12 वाजता महाआरती होऊन महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार होणार आहे.
या उत्सवासाठी भव्य मंडप साकारण्यात आला असून यागासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील महिला पुरुष भक्तांनी या श्रीमद् देवीभागवत सप्ताह व पंचकुंडात्मक शतचंडी याग उत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या पत्रकार परिषदेत श्रीजगदंब परिवाराचे सेवेकरी शैलेशराव देशमुख, प्रदीप कुलकर्णी,सुनिल कुऱ्हेकर,दिनेश जोशी,निखिल देशमुख, मंदार देशपांडे, गणेश दलाल, विवेक देशपांडे, मयंक देशपांडे, विनायकराव जोशी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा