- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-local-politics-corporator: अकोला महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवर प्रश्नचिन्ह; काही पक्षांत नाराजी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तज्ज्ञांना संधी देण्याची तरतूद असताना निवड प्रक्रियेवर चर्चा; तर शिवसेना (उबाठा) व काँग्रेसमध्ये राजीनाम्यांची मालिका
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राज्यसभा आणि विधान परिषदेसारख्याच धर्तीवर महानगर पालिका मध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करण्याची तरतूद आहे. साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य, वैद्यकीय, शिक्षण, अभियांत्रिकी किंवा विधी क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींना पाच वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करता येते.
मात्र अकोला महानगरपालिकेत झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत या निकषांचे पालन झाले का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या विशेष सभेत आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. या पदांसाठी एकूण 19 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी विविध पक्षांनी शिफारस केलेल्या उमेदवारांची निवड निश्चित करण्यात आली.
भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीकडून ॲड. देवाशिष काकड, माजी नगरसेवक ॲड. गिरीश गोखले, सामाजिक कार्यकर्त्या चंदा शर्मा आणि माजी नगरसेवक सुनील मेश्राम यांची निवड झाली.
काँग्रेसकडून सामाजिक कार्यकर्ते आकाश कवडे आणि काँग्रेस आमदार यांचे निकटवर्तीय इलियास खान उर्फ गुड्डू पठाण यांना संधी देण्यात आली.
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून काँग्रेसमधून काही महिन्या पूर्वी प्रवेश केलेल्या शंकर लंगोटे यांना संधी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने बांधकाम व्यावसायिक सुनील इन्नानी यांना उमेदवारी देत त्यांची निवड केली.
पक्षांच्या शिफारशींनुसार अर्ज पात्र ठरल्याने या आठही स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा सभेत करण्यात आली.
मात्र या निवडीनंतर काही पक्षांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. शिवसेना (उबाठा) मध्ये उमेदवारी न मिळाल्याने सुमारे 25 पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
तर काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने बांधकाम व्यावसायिकाला उमेदवारी दिल्याने शहरात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या निवड प्रक्रियेत राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय आणि निवडणूक वेळी नाराज झालेल्यांना संधी देण्यात आली. जन सामान्य मधून एकही उमेदवार नसल्याने ही पद्धत लोकशाहीस घातक असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांमधून उमटत आहेत.
ठळक मुद्दे
अकोला महापालिकेत आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर
या पदांसाठी एकूण 19 अर्ज दाखल
भाजपप्रणीत आघाडीचे चार उमेदवार निवडून
काँग्रेसकडून दोन उमेदवारांना संधी
शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी एक जागा
उमेदवारी न मिळाल्याने काही पक्षांत नाराजी
शिवसेना (उबाठा) मध्ये 25 कार्यकर्त्यांच्या राजीनाम्याची चर्चा
काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव यांचा राजीनामा
Akola Municipal Corporation
akola news
Akola Politics
breaking news
Local Politics
maharashtra politics
Nominated Corporators
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा